नागपूर : आधी वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn), नंतर नागपुरातील टाटा एअरबस (Tata Airbus Project) त्यांनतंर आता पुन्हा नागपुरमधील एक प्रोजेक्ट राज्याबाहेर गेला आहे. नागपुरच्या मिहान परिसरात होणारा विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प हैदराबादलामध्ये गेला आहे. नुकतच टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमधील वडोदऱ्याला गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारवर सडकुन टिका करण्यात येत होती. आता पुन्हा हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने आता पुन्हा राज्य सरकार निशाण्यावर आलं आहे.
[read_also content=”SRA घोटाळ्यांप्रकरणी पेडणेकरांविरोधात वर्षभरापूर्वीच तक्रार! ठाकरेंच्या दबावामुळे चौकशी केली गेली नाही – किरीट सोमय्या https://www.navarashtra.com/maharashtra/complaint-against-pednekar-in-sra-scam-case-a-year-ago-inquiry-not-held-due-to-pressure-from-thackeray-kirit-somaiya-340243.html”]
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेल्याने राज्याता संतापाची लाट उसळली आहे. सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट हा नागपूरमध्ये (Nagpur)होणारा प्रकल्प देखील गुजरातमध्ये गेला आहे. आता पुन्हा नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला (Hyderabad) गेल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विमान आणि रॉकेटचे इंजन बनवणारा हा प्रोजेक्ट होता. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रननच्या वतीने हा प्रोजेक्ट नागपुराातील मिहानमध्ये होणार होता. मात्र प्रशासकीय कामात विलंब होत असल्यांच कारण पुढे करत हा प्रकल्प हैदराबादलामध्ये वळवण्यात आला आहे.
[read_also content=”इलॉन मस्कचे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश, धोरणांमध्येही बदल होणार https://www.navarashtra.com/world/elon-musks-order-to-lay-off-twitter-employees-will-also-change-policies-nrps-340168.html”]