औरंगाबाद – राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. यामुध्ये नाशिक, औरंगाबाद, परभणीमध्ये मुस्लिम धर्मियांनी रस्त्यावर उतरत मोर्चा काढला होता. हा मोर्चा जुम्माच्या नमाजनंतर काढण्यात आला. ज्यात मुस्लिम भाविक रस्त्यावर उतरले. तर असाच निषेध मोर्चा आज एएमआयएमच्या नेतृत्वात औरंगाबादमध्येही आयोजित करण्यात आला होता. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुपूर शर्मा व कुमार जिंदाल यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. तसेच त्यांनी दंगा भडकावणाऱ्यांना धरून पोलिसांकडे देण्याची जबाबदारी ही मुस्लिमसमाजाची असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी हे करण्याची जबाबदारी सच्चा मुस्लिमानची असल्याचेही म्हटलं आहे.
नुपूर शर्माने जे वक्तव्य केलंय त्यामुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचे म्हटलं आहे. हे वक्तव्य करून १० दिवस झाले, लोक दहा दिवस शांत बसले मात्र काहीही कारवाई झालेली नाही. फक्त पार्टीतून काढून टाकलं म्हणजे कारवाई होत नाही, गुन्हा दाखल झाला पाहिजे. अटक झाली पाहिजे. मुहंमद पैगंबर यांच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी एक कायदा झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.