मुंबई : सध्या अनेक शाळा उदयास आल्या आहेत. त्यात इंग्रजी शाळांना (English Medium School) वाढती पसंती आहे. असे असताना मराठी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा टक्का चांगलाच घसरला आहे. त्यात आता सरकारी शाळांमधील (Government School) विद्यार्थी संख्या घटल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत तब्बल 3 लाख विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. अशी जरी परिस्थिती असली तरी पुणे, मुंबईत मात्र नऊ हजार विद्यार्थी वाढले आहेत.
इंग्रजी शाळांचे वाढते आकर्षण, सरकारी शाळांमध्ये असलेल्या उणीवा या सर्व बाबी लक्षात घेता विद्यार्थी बिगर सरकारी शाळांना पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शाळा बदलल्या आहेत. त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांवर झाला आहे. गेल्या वर्षभरात या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून तब्बल 3 लाख 768 विद्यार्थी घटल्याची गंभीर बाब यू-डायसच्या ताज्या अहवालातून पुढे आली आहे.
जिल्हानिहाय विद्यार्थ्यांची घट
जिल्हा – 2022 आणि 2023
नंदुरबार – १,०३,२६३ – ९८.१८८
धुळे – १,००,०६४ – ९०,९३१
जळगाव – २,०२,२२२ – १,८९,८५३
बुलढाणा – १,८५,६५३ – १,७३,७७२
अकोला – ८६,१२९ – ७८२८१
वाशिम – ७९.२९२ – ७१.८५७
अमरावती – १,४४,२८२ – १३७,५२५
वर्धा – ५४,६९१ – ५२, ५३६
जालना – १,६३,६२५ – १,४६,०६१
छ. संभाजीनगर – २,४२,६८४ – २,१७, ३९८
नाशिक – ३,२७,५१० – ३,१४,५०६
ठाणे – २,०२,४८८ – १,९५,५३३
मुंबई उपनगर २,९२,८२५ – ३,०७,६९६
रायगड – १०४,०३७ – १,००,४१८
पुणे – ३,८४,२२० – ३,९३,५४९
नागपूर, चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली
नागपूर, चंद्रपूर, नांदेड, नाशिक, मुंबई, रायगड, पुणे, सोलापूर, सांगली या महापालिका शाळांमध्ये २१ हजार ७३८ विद्यार्थी वाढले आहेत. तर मुंबई उपनगरमध्ये १४ हजार ८७१, पुणे जिल्ह्यात ९ हजार ३२९ विद्यार्थी सरकारी शाळेत विद्यार्थी संख्या वाढली आहे.