बदलापूर – बदलापूरमधून (Badalapur) एक मोठी व गंभीर बातमी समोर येत आहे. बदलापूरच्या एमआयडीतील रासायनिक कंपनीला भीषण आग लागली आहे. (Heavy fire at a chemical company in MIDC) दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire bridge) सहा गाड्या व सहा पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल झालेत. या आगीत २ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
बिग ब्रेकिंग
बदलापूरच्या एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग
अग्निशमन दलाच्या सहा गाड्या व सहा पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल
आगीमुळं परिसरात धुराचे साम्राज्य
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु pic.twitter.com/5exeVbkbOz
— Amrut Bharmu Sutar (@amarsutar9) February 12, 2023
कंपनीला भीषण आग…
दरम्यान, आग एवढी मोठी भीषण आहे, की, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, तसेच यात काही वित्तहानी किंवा जिवितहानी झाल्याची माहिती समोर येत नाहीय. आग मोठी असल्यानं आग विझविण्यास विलंब लागत असल्याची माहिती समोर येते.
परिसरात धुराचे साम्राज्य…
दरम्यान, आग एवढी भयानक आणि भीषण आहे की, या आगीमुळं परिसरात धुराचे लोट पसरले आहेत, आगीचे लोळ आणि धुराचे लोट यामुळं परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.