बाळाला रात्रभर बॅगमध्ये ठेवलं, अंत्यसंस्काराच्या वेळी चमत्कार? जिवंत बाळ डॉक्टरांकडून मृत घोषित (फोटो सौजन्य-X)
Beed New Born Baby News in Marathi : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे डॉक्टरांनी एका नवजात बाळाला मृत घोषित केले होते. परंतु १२ तासांनंतर जेव्हा कुटुंबांकडून अंत्यसंस्कार करण्यात येतं होते, मुलाच्या आजीने त्याचा चेहरा पाहण्याचा आग्रह धरला, त्या दरम्यान बाळाची हालचाल दिसली. तेव्हा मात्र बाळ अचानक रडू लागलं. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आता बाळाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे.
अंबाजोगाई तहसीलच्या स्वामी रामानंद तीर्थ सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या एका नवजात बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केले, परंतु अंत्यसंस्कारच्या वेळेत बाळ जिवंत आढळला. ही घटना ७ जुलैच्या रात्रीची आहे. रुग्णालयात एका महिलेने बाळाला जन्म दिला, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बाळाला १२ तास एका बॅगेत ठेवण्यात आले. कुटुंब त्याला अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले त्यावेळी मात्र चमत्कार पाहायला मिळाला.
मुलाचे आजोबा सखाराम घुगे यांनी सांगितले की, त्यांनी नवजात बाळाला मोटारसायकलवर एका बॅगेत भरून नेले होते. आजीने बाळाला पुरण्यापूर्वी त्याचा चेहरा पाहण्याचा आग्रह धरला. बाळ उघडले तेव्हा त्याला हालचाल दिसली. सर्वांना धक्का बसला आणि बाळ जिवंत होते.
मुलाला तात्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मुलाची आई बालिका घुगे म्हणाल्या की जेव्हा ते रुग्णालयातून बाहेर पडत होते तेव्हाही त्यांनी बाळाची हालचाल पाहिली होती, परंतु नर्सने ते नाकारले.
घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
दरम्यान अंत्यसंस्कारावेळी बाळ जिवंत असल्याचं दिसून आल्यानंतर बाळाच्या नातेवाईकांनी पुन्हा हॉस्पिटल गाठलं.. आणि बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आलेत… मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रामानंद तीर्थ हॉस्पिटलची लक्तरं वेशीवर टांगली गेली..तर आरोग्य खात्याने उरली सुरली इभ्रत वाचवण्यासाठी 2 चौकशी समितीची स्थापना केलीय.