एका विवाहित महिलेने तिच्यावर भयंकर आरोप केले आहेत. तिच्या पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून खासगी क्षणांचे व्हिडीओ मित्रांसोबत शेअर केल्याचा आरोप केला आहे. तिच्या पतीने मितांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. तिने नकार दिल्यावर तिचे अश्लील व्हिडीओ बनवण्यात आले असे आरोप केले आहे. महिलेने तिच्या पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध छळ, ब्लॅकमेल आणि शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार कर्नाटकच्या पुत्तेनहल्लीमध्ये घडला आहे.
Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
नेमक प्रकरण काय?
या महिलेने सांगितले की, २०२४च्या डिसेम्बर महिन्यात तिचे लग्न सैय्यद इनामुल हक याच्याशी झाले. त्यांच्या लग्नाच्या वेळी 340 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक यामाहा बाईक देण्यात आली होती. लग्नानंतर तिला कळले की तिचा पती आधीच विवाहित आहे. एवढेच नाही तर त्याचे इतर 19 महिलांशी संबंध असल्याचेही तिला माहिती पडले.
विदेशी मित्रांसोबत शारीरिक संबंध
तक्रारीत महिलेने सांगितले की, तिच्या पतीने कोणालाही माहिती न होता बेडरूममध्ये एक कॅमेरा लावला आणि खासगी क्षणांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून विदेशातल्या मित्रांना पाठवले. एवढेच नाहीत तर विदेशातील त्याच्या ओळखीच्या व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कथितपणे दबाव टाकत असे. तिने विरोध केल्यावर, त्याने तिचे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर सार्वजनिक करण्याची धमकी दिली.
माहेरीही अत्याचार
पीडित महिलेने तिच्या पतीवर सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्समध्ये आणि अगदी तिच्या माहेरीही (आई-वडिलांच्या घरी) वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. एका घटनेत, त्याने फ्लॅट खरेदी करण्यासाठी तिला तिचे सोन्याचे दागिने विकण्यास दबाव आणला आणि तिने नकार दिल्यावर तिला मारहाण केली, असेही तिने सांगितले.
आरोपी फरार
फेब्रुवारी महिन्यात एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान, पतीच्या बहिणीने कथितपणे तक्रारदार महिलेचा अपमान केला, तर तिच्या मेहुण्याने तिच्यासोबत लैंगिकदृष्ट्या गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. 21 सप्टेंबर रोजी, आरोपी पतीने भांडणादरम्यान तक्रारदार महिलेवर कथितपणे हल्ला केला आणि नंतर तो घरातून पळून गेला. तेव्हा पासून ततो फरार आहे. पती आणि सासरच्या मंडळीं विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?