Photo Credit- Social Media
बीड: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. विरोधकांसह स्थानिक नागरिकांकडूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. तर राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या राजीनाम्यासाठी दवाब वाढू लागला आहे. या सगळ्यातच काल धनंजय मुंडे यांनी परळीतील भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्यानंतर नामदेव शास्त्री यांनीदेखील काल सकाळीच पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला. पण नामदेव शास्त्री यांच्या या पत्रकार परिषदेनंतर धनंजय मुंडे यांनी शास्त्रींची भेट का घेतली. यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे वर्चस्व राहिले आहे. पण संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंवर आरोप होत असून त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते म्हणून लक्ष्य केलं जात आहे. या सगळ्यातच धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जात वंजारी समाज त्याच्या पाठिशी असल्याचाही एकप्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
Budget 2025 : करदात्यांना अर्थसंकल्पात दिलासा; १२ लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे अजित पवार सत्तेत असतानाही त्यांचे मंत्रिपद टिकवण्यासाठी कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीयेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी भगवान गडार जात नामदेव शास्त्रींच्या माध्यमातून बीडमधील वंजारी समाज त्यांच्या पाठिशी असल्याचा अप्रत्यक्षरित्या दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर जर कठोर कारवाई झाल्यास वंजारी समाजाची नाराजी ओढावू शकते, आणि त्याचा निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो, हेही दाखवून देण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी केल्याचे दिसत आहे.
याशिवाय, ओबीसी आणि वंजारी समाज हा भाजपचा प्रमुख मतदाते आहेत. भाजपला मतांची धनंजय मुंडे यांना जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले, तर ओबीसी समाजाडी नाराजी ओढावू शकते. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी भगवान गडाची मदत घेतली असावी. भगवानगड हे वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असून, महंत नामदेव शास्त्री यांचा समाजावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी उघडपणे धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याने त्यांचा प्रभाव अधिक वाढला आहे. अशा परिस्थितीत, भाजप आणि अजित पवार यांनी जर धनंजय मुंडेंवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना वंजारी समाजाच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते.
आयुष्याला कंटाळला अन् थेट घेतला टोकाचा निर्णय! स्वतःला संपवण्यासाठी पाण्यात मारली
सध्या अजित पवार भाजपसोबत सत्तेत असले तरी धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये ते त्यांना कितपत साथ देतील, याबद्दल शंका आहे. जर धनंजय मुंडेंना मंत्रीपद सोडावे लागले, तर याचा थेट लाभ पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना होऊ शकतो, हे धनंजय मुंडेंना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी भगवानगडावर जाऊन वंजारी समाजाची एकजूट मजबूत केली, जेणेकरून भाजप आणि अजित पवारांवर राजकीय दबाव वाढवता येईल. धनंजय मुंडेंच्या या दौऱ्यामागील स्पष्ट संकेत असे आहेत की वंजारी समाज त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाल्यास, भाजप आणि अजित पवारांना या समाजाच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो.