(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात आपल्याला अनेक विचित्र, हास्यास्पद तसेच धक्कादायक गोष्टी पाहायला मिळतात, ज्यांना पाहून आपल्याक नेहमीच थक्क व्हायला होते. इथे अनेकदा अशा घटनाही शेअर केल्या जातात ज्यांचा कधी आपण स्वप्नातही विचार केला नसावा. मग जेव्हा अशा घटना आपल्या समोर येतात तेव्हा आपल्या पायाखालची जमीनच हादरते. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे जी वेगाने व्हायरल होत आहे.
मागील काही काळात जर आपण डोकावून पाहिले तर सोशल मीडियाच्या दुनियेत अशा अनेक गोष्टी व्हायरल झाल्या ज्यांनी लोकांना हादरवून सोडले. सध्याच्या घटनाही अशीच काहीशी आहे, ज्यात एक तरुण आपल्या आयुष्याला कंटाळत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. येत्या काळात अशा घटना फार वाढल्या आहेत. लोक आपल्या आयुष्याला इतके कंटाळले आहेत की रोज अशा नवनवीन घटना समोर येतात. पण आता तर या घटनेचा थेट व्हिडिओच समोर आला आहे ज्यातील दृश्ये अनेकांना थक्क करत आहेत. यात नक्की काय आणि कसे घडले ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर यात तुम्हाला उंच धबधब्यावर एक तरुण मुलगा उभा असल्याचे दिसेल. तरुणाला असे धबधब्याच्या कठड्यावर उभे असल्याचे पाहून आजूबाजूचे पर्यटक घाबरून आरडाओरड करू लागतात. यानंतर काही क्षणातच तरुण टोकाचे पाऊल उचलतो आणि या धबधब्यात उडी मारतो. स्वतःला संपवण्याच्या उद्देशाने तो पाण्याच्या दिशेने जोरदार झेप घेतो खरा मात्र पुढे काही वेगळेच घडून बसते. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला एक नाविक तरुणाला आपल्या नावेत चढवत त्याचा जीव वाचवताना दिसून येतो आणि यासहच व्हिडिओचा शेवट होतो. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, ही घटना छत्तीसगढमधील असल्याचे समजत आहे. घटना गंभीर असली तरी याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
दरम्यान या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ @dhakad__pila नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये, ‘पुन्हा चित्रकूट धबधब्यात तरुणाचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, बोटीवाल्यांनी वेळीच वाचवला जीव’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “व्हायरल होण्याचा चांगला प्रयत्न आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे एक आहे, एकतर त्याला पोहायला येते आणि दुसरे म्हणजे त्याला जीव द्यायचा असता तर त्याने नावेची मदत घेतली नसती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.