सुरेश धस यांनी शिवराज दिवटे मारहाण प्रकरणावरुन बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला (फोटो - सोशल मीडिया)
बीड: मागील दोन महिन्यांपासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील राजकारणातही मोठा मोठा गदारोळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य करत “मी बोललो की बीडची बदनामी होते, असा आरोप केला जातो,” असे म्हणत त्यांनी बीडमधील राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून सुरेश धस सातत्याने बीडमधील माफिया आणि मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करताना दिसून येत आहेत. सुरेश धस यांनी अनेकदा धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना परळी आणि आंबेजोगाईमध्ये एक रुपयाचेही काम न करता बोगस बिलं दाखवून 73 कोटी हडप केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आणि त्यापूर्वीही त्यांनी अनेक आरोप केले होते. त्यांच्या आरोपांनंतर बीडच्याच नव्हे तर राज्याच्याही राजकीय वर्तुळातहही खळबळ माजली होती. त्यानंतर धनंजय मुंडेंंवर कारवाई होईल, असी चर्चा होती. धनजय मुंडें राजीनमा देतील अशी चर्चा होती.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, मंगळवारी, बीडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौर्यात त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफल साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पामुळे 30 गावांतील सुमारे 80 हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. 2800 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार सुरेश धस यांच्या महत्त्वाकांक्षी खुंटेफळ साठवण प्रकल्पाच्या कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेअंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन बोगदा कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पामुळे आष्टी परिसरातील ३० गावांतील २५,५४३ हेक्टर म्हणजेच ८०,००० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तिसऱ्यांदा आमदार झाल्यावर सुरेश धस यांनी कुकडी प्रकल्पातून ५०० एमसीएफटी पाणी मेहेकरीच्या प्रकल्पात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता, त्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागला. २००५ पासून उजनी धरणातील अतिरिक्त पाणी बोगद्याद्वारे पाइपलाइनने खुंटेफळ साठवण तलावात आणण्याचा त्यांचा संकल्प होता.
अंतराळापेक्षा अधिक रहस्यमय का आहे महासागर? जाणून घ्या समुद्रतळात खोलवर गेल्यावर काय
या संदर्भात बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्रिपद तिसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आष्टी मतदारसंघात जाहीर कार्यक्रमासाठी आले आहेत. आमच्यासाठी हा आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त भागात नक्कीच हरितक्रांती घडेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून बीड जिल्हा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. खंडणीप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण सातत्याने पुढे नेले असून, त्यांनी थेट धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर उघडपणे टीका केली होती. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता होती. मात्र, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे तिघेही एकाच व्यासपीठावर दिसून आले.