शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराड कुठे होता? (फोटो- टीम नवराष्ट्र)
Santosh Deshmukh News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. काल ज्याच्यावर या हत्या प्रकरणात आरोपी म्हणून पाहिले जात आहे असा वाल्मीक कराड काल पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. त्याला रात्री बीडमध्ये आणण्यात आले. वाल्मीक कराडबाबत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सीआयडीने केली होती. ती विनंती मान्य करत केज कोर्टाने काल रात्रीच या प्रकरणावर सुनावणी घेतली. सुनावणीनंतर कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र वाल्मीक कराडने पुण्यात येण्यापूर्वी कोणत्या राज्यात प्रवास केला होता आणि तो पुण्यात कसा आला हे पाहुयात.
तब्बल 22 दिवसानंतर वाल्मीक कराड हा शरण आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मीक कराड शरण आला मात्र 22 दिवस तो कुठे होता. पोलिसांना त्यांचा शोध कसा लागला नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये तो नक्की कुठे होता याबद्दल काही माहिती समोर आली आहे.
सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराड मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला होता असे सांगितले जात आहे. सीआयडीसमोर येण्याआधी तो उज्जैनमध्ये गेला. त्यानंतर तो कर्नाटक आणि गोवा राज्यात लपला असे समोर येत आहे. मग तो पुण्यात आला. या तीनही राज्यात स्वतःच्या कारने तो फिरला असे सीआयडीच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर तो काल पुण्यात स्वतःच्या गाडीतून सीआयडी ऑफिसमध्ये गेला आणि शरण आला.
आता संतोष देशमुख प्रकरणात त्याची चौकशी केली जात आहे. त्याची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. मात्र वाल्मीक कराड हा शरण आल्याने त्याची संपत्ती जप्त करूनये अशी मागणी वाल्मीक कराडचे वकील कोर्टसमोर करण्याची शक्यता आहे.
कोर्टात काय घडले?
सरकारी वकिलांचा युक्तीवाद
कोर्टात झालेल्या युक्तीवादामध्ये सीआयडीने संतोष देशमुख हत्या आणि खंडणी मागीतल्याचे परस्पर संबंध आहे . तसेच वाल्मीक कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे. आरोपी सुदर्शन घुले वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा. वाल्मीक कराडच्या कोठडीशिवाय सुदर्शन घुलेकहा शोध घेणे अशक्य आहे. त्यासाठी वाल्मीक कराडला 15 दिवसांची कोठडी द्यावी. सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी कोठडी द्यावी.
हेही वाचा: Big Breaking: वाल्मीक कराडला 14 दिवसांची CID कोठडी; केज कोर्टाचा मोठा निर्णय
वाल्मीक कराडच्या वकिलांचा युक्तीवाद.
वाल्मीक कराडच्या वकिलांनी युक्तीवाद करताना त्याच्यावर केवळ खंडणी प्रकरणात आरोप आहेत. वाल्मीक कराड हा एक सामाजिक कार्यक्रता आणि गरीब राजकारणी असल्याचे सांगितले. तर वाल्मीक कराडला जाणूनबुजून अडकवण्यात येत असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. खंडणीचा आरोप आहे म्हणून कोठडी मागणे चुकीचे आहे. आवाजचे नमुने देण्यास तयार आहोत मात्र कोठडी नको. वाल्मीक कराड स्वतः शरण आले आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. 308 कलम हे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले. मिडिया ट्रायल पाहून निर्णय देण्यात येऊ नये.