संतोष देशमुख प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान आज वाल्मीक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर त्याला आणण्यात आले. केज येथे कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी 15 दिवसांच्या कोठडीची मागणी सीआयडीने कोर्टासमोर केली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत केज कोर्टाने वाल्मीक कराडला कोठडी सुनावली आहे.
केज कोर्टात हजर करण्यापूर्वी वाल्मीक कराड याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला कोर्टसमोर हजर करण्यात आले. त्यावेळेस पोलिसांकडून कोर्टाला वाल्मीक कराडला 15 दिवसांची कोठडी देण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपी सुदर्शन घुले याचा शोध घेण्यासाठी वाल्मीक कराड यांच्या कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी कोर्टासमोर सांगितले. सरकारी वकील आणि वाल्मीक कराड यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाल्याचे पाहायला मिळाले.
सरकारी वकिलांचा युक्तीवाद
कोर्टात झालेल्या युक्तीवादामध्ये सीआयडीने संतोष देशमुख हत्या आणि खंडणी मागीतल्याचे परस्पर संबंध आहे . तसेच वाल्मीक कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे. आरोपी सुदर्शन घुले वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा. वाल्मीक कराडच्या कोठडीशिवाय सुदर्शन घुलेकहा शोध घेणे अशक्य आहे. त्यासाठी वाल्मीक कराडला 15 दिवसांची कोठडी द्यावी. सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी कोठडी द्यावी.
वाल्मीक कराडच्या वकिलांचा युक्तीवाद.
वाल्मीक कराडच्या वकिलांनी युक्तीवाद करताना त्याच्यावर केवळ खंडणी प्रकरणात आरोप आहेत. वाल्मीक कराड हा एक सामाजिक कार्यक्रता आणि गरीब राजकारणी असल्याचे सांगितले. तर वाल्मीक कराडला जाणूनबुजून अडकवण्यात येत असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. खंडणीचा आरोप आहे म्हणून कोठडी मागणे चुकीचे आहे. आवाजचे नमुने देण्यास तयार आहोत मात्र कोठडी नको. वाल्मीक कराड स्वतः शरण आले आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. 308 कलम हे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले. मिडिया ट्रायल पाहून निर्णय देण्यात येऊ नये.
हेही वाचा: Santosh Deshmukh News: वाल्मीक कराडच्या सरेंडरवर फडणवीस स्पष्टच बोलले; ” सर्व आरोपींना फाशी…”
वाल्मीक कराडचे आत्मसमर्पण
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याने आज सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. सीआयडीने आतापर्यंतच्या केलेल्या तपासातून वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती होती. त्यानुसार, आता कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे दिसत आहे. दरम्यान, कराड याची 100 हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहे. वाल्मिक कराड महाराष्ट्रात असल्याचे तपासातून समोर आले होते. वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआयडीचे विशेष पथकही रवाना करण्यात आले होते. आजपासून सीआयडीच्या आणखी चार टीमही कराडच्या शोधासाठी पाठवण्यात येणार होत्या. तत्पूर्वी त्याने स्वत:हून आत्मसमर्पण केले.
हेही वाचा: Walmik Karad : CID चे अधिकारी सारंग आव्हाड यांनी वाल्मिक कराडविषयी दिली मोठी माहिती; म्हणाले, ‘फरार आरोपी…’
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
कोणालाही खंडणी मागता येणार नाही. आम्ही अत्यंत वेगाने तपास केला आहे. त्यामुळेच वाल्मीक कराड शरण आला आहे. हत्ये करणारे जे फरार आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी अनेक पथके सर्वत्र रवाना करण्यात आली आहेत. कुठलाही आरोपीला आम्ही सोडणार नाही. सर्वांना शोधून काढू. स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. तुम्ही काळजी करू नका. काहीही झाले तरी सगळे दोषी शोधून त्यांना फाशी होत नाही तोवर ही कारवाई थांबणार नाही, असे आश्वासन मी धनंजय देशमुख यांना दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण जाणीवपूर्वक सीआयडीकडे देण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दवाब खवपून घेणार नाही