पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) काल पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच कडून त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करण्यात आला. या दरम्यान राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर राज्यपाल व्यक्त झाल्याची माहिती समोर येत आहे. “माझ्याकडून चूक झाली. मी दिलगिरी व्यक्त करतो”, अस त्यांनी म्हण्टल्याचा दावा प्रशांत जगताप यांनी केला आहे.
[read_also content=”मुंबईत आजपासून १५ दिवसांसाठी जमावबंदी; पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई https://www.navarashtra.com/maharashtra/ban-in-mumbai-for-15-days-from-today-gathering-of-more-than-five-people-is-prohibited-350449.html”]
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल पुणे दौऱ्यात वेगेवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. या दौऱ्यात यावेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील तीन पुस्तके राज्यपालांना भेट स्वरुपात दिली. तर यावेळी राज्यपालांनी शिवरायाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितलं.