Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara: ३०० कोटींच्या उड्डाणपुलाला ३ वर्षांत गळती; पिलरमधून वाहतेय पाणी, महामार्ग प्राधिकरणाचा कारभार

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे ३०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या ६ पदरी उड्डाणपुलाला अवघ्या तीन वर्षांतच गळती लागली असून पिलरमधून पाण्याचे लोट वाहत आहेत. २९ मार्च २०२२ रोजी लोकार्पण झालेल्या या पुलाच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून नगर परिषदेने महामार्ग प्राधिकरणाला दुरुस्तीचे पत्र पाठवले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 26, 2026 | 09:24 PM
Bhandara: ३०० कोटींच्या उड्डाणपुलाला ३ वर्षांत गळती; पिलरमधून वाहतेय पाणी, महामार्ग प्राधिकरणाचा कारभार
Follow Us
Follow Us:
  • ₹३०० कोटींच्या उड्डाणपुलाच्या पिलरमधून अवघ्या ३ वर्षांत पाण्याच्या धारा वाहू लागल्या आहेत.
  • निकृष्ट कामामुळे पुलाचे जॉइंट सुटून पृष्ठभागावरील डांबरी थर अनेक ठिकाणी उखडला आहे.
  • नगर परिषद प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तातडीने दुरुस्तीसाठी कडक पत्र पाठवले जाणार आहे.

शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ३०० कोटी रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या ६ पदरी उड्डाण पुलाच्या (ओव्हरब्रीज) गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यात पुलाच्या पिलरमधून पाण्याच्या धारा वाहत आहेत. तब्बल ३०० कोटींच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी उड्डाण पुलाचे लोकार्पण २९ मार्च २०२२ रोजी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते मोठ्या थाटात करण्यात आले होते. या ओव्हरब्रीजच्या निर्मितीमुळे साकोली शहराच्या मुख्य मार्गावरील जडवाहनांच्या ताणतणावात मोठी घट होऊन स्थानिकांना वाहतूककोंडीच्या समस्येपासून दिलासा मिळाला होता. परंतु, केवळ तीन-चार वर्षांच्या अल्प कालावधीतच या कोट्यवधींच्या पुलाची झालेली दैना अत्यंत चिंताजनक ठरत आहे.

मुसळधार पावसामुळे या पुलाच्या पिलरमधील भेगामधून पाण्याचा विसर्ग अतिशय वेगाने होत आहे. पुलाच्या पिलर क्रमांक ४५, ४६ आणि ६६ मधील जॉइंट सुटले असून त्यामधून पावसाचे पाणी नळाच्या धारेप्रमाणे खाली जमिनीवर वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल

३०० कोटींच्या निधीतून उभा राहिलेला हा उड्डाण पूल विकासाचे प्रतीक मानला गेला होता. परंतु अवघ्या तीन वर्षांतच त्याच्या पिलरमधून नळासारखे पाणी वाहू लागणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या पैशांची सर्रास उधळण करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे हे स्पष्ट प्रमाण आहे. आज पुलाचे जॉइंट सुटत आहेत आणि डांबरी थर उखडत आहेत, उद्या एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? – कैलास गेडाम, जिल्हा महासचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम

७५ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धोरणानुसार संबंधित कंत्राटदार कंपनीला दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच उड्डाण पुलाची पाहणी करून तातडीने मेंटेनेंस व दुरुस्ती करणे कायद्याने अनिवार्य असते. मागील तीन वर्षांपासून सातत्याने पावसाळ्यात या पुलावरून पाण्याची गळती होत आहे. नगर परिषदेमार्फत आता थेट थेट राष्ट्रीय महामार्ग हामार्ग प्राधिकरणाला गाला अधिकृत पत्र पाठवून या पुलाची तातडीने व दीर्घकालीन दुरुस्ती करून घेण्याबाबत कडक सूचना दिल्या जातील.

मोठी बातमी ! केंद्राकडे महाराष्ट्राची 1754 कोटींची थकबाकी; मनेरगाच्या प्रश्नावर राज्यसभेत सरकारची कबुली

पाण्याच्या सततच्या धारेमुळे केवळ पिलरच नव्हे, तर पुलाच्या अगदी वरच्या पृष्ठभागावरील (सरफेस) डांबरी थर अनेक ठिकाणी उखडला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या आतच हा राष्ट्रीय स्तरावरील पूल मेंटेनन्स आणि दुरुस्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्यामुळे या प्रकल्पाचे काम करणाऱ्या संबंधित कंपनीच्या निकृष्ट कार्यप्रणालीवर आणि यंत्रणेच्या देखरेखीवर तीव्र शंका उपस्थित होत आहे. या खस्ताहाल आणि धोक्याच्या परिस्थितीमुळे शहरातील नागरिक व वाहनचालक स्वतःच्या सुरक्षेबाबत कमालीचे धास्तावले आहेत.

Web Title: Bhandara sakoli 300 crore flyover pillar leakage issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • Bhandara
  • Local News
  • maharshtra

संबंधित बातम्या

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल
1

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त
2

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhandara News: बाजारपेठेवर चढला जन्माष्टमीचा रंग! मूर्तिकारांची लगबग; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुलला
3

Bhandara News: बाजारपेठेवर चढला जन्माष्टमीचा रंग! मूर्तिकारांची लगबग; पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुलला

Bhandara News: केवायसीने अडविला लाडक्या बहिणींचा हप्ता! जिल्ह्यात २ लाख ९९ हजार लाभार्थी, शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष
4

Bhandara News: केवायसीने अडविला लाडक्या बहिणींचा हप्ता! जिल्ह्यात २ लाख ९९ हजार लाभार्थी, शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.