मुंबई : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना शिवडी कोर्टाने (Shivdi Court) तात्पुरता दिलासा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील सुनावणीपर्यंत, १९ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्याविरोधात अजामानीपत्र वॉरंट बजावण्यात येणार नाही. राज्य सरकारतर्फे सरकारी वकिलांनी कोर्टात तशी हमी दिली आहे.
[read_also content=”आमिर खानने दिल्लीतल्या कार्यक्रमात ‘चॅम्पियन्स’ चित्रपटाबद्दल केला महत्त्वाचा खुलासा, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/movies/aamir-khan-announcement-about-producing-champions-movie-nrsr-344916.html”]
बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शिवडी कोर्टाने नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची कारवाई केली होती. परंतु हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दंडाधिकारी कोर्टाला अशाप्रकारे वॉरंट बजावण्याचे अधिकार नाहीत, अशी तक्रार नवनीत कौर राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने शिवडी कोर्टाच्या कारवाईला १९ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती देत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र १९ नोव्हेंबरपर्यंत आम्ही कुठलीही कारवाई करणार नाही, अशी हमी कोर्टाला दिली. त्यामुळे नवनीत राणा यांना १९ नोव्हेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे. तोपर्यंत राणा यांच्याकडे कोर्टाकडून हा वॉरंट रद्द करुन घेण्यासाठी मुदत मिळाली आहे. परिणामी नवनीत राणा यांना पुढील सुनावणीपर्यंत दिलासा मिळाला आहे.