'एकीच्याही केसाला धक्का लागला तर..' ; उद्धव ठाकरेंनी थेट कोल्हापूरच्या 'मुन्ना'ला भरला दम
मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी राज्यामध्ये वातावरण निर्मिती केली जात आहे. बैठका, दौरे आणि सभा यांचे सत्र वाढले आहेत. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख अनेकदा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. दरम्यान, महामेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी कोणीही मुख्यमंत्री झाला तरी माझा पूर्ण पाठिंबा असेल असे वक्तव्य केले. त्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करायची?
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. महायुतीकडून उद्धव ठाकरे यांना सातत्याने लक्ष्य केले जाते. लोकसभा निवडणूकीमध्ये देखील शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर बाजप नेत्यांनी आगपाखड केली होती. त्यानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणूकीमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार की नाही यावरुन भाजपने निशाणा साधला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपाने असंख्य शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीचे महत्त्व कमी करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करायची? याची परिसीमा त्यांनी ओलांडली आहे. असा घणाघात प्रसाद लाड यांनी केला आहे.
प्रचाराची रणधुमाळी सुरु
मुख्यमंत्री पदावरुन ‘दोन हाणा, पण मला बाजीराव म्हणा’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली असल्याचा घणाघात प्रसाद लाड यांनी केला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा तर शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. महाविकास आघाडीने महामेळावा घेतला आहे. त्याचप्रमाणे भाजपाने देखील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतलेला आहे. महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महायुतीकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून समोर येणारी की महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांना पुन्हा संधी देणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिली आहे.