मुंबई – अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East bypoll) भाजपाने अर्ज मागे घ्यावा, असं शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीचा ऋतुजा लटके यांचा विजय सुकर करण्यासाठी भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या सांस्कृतीचा मान वाढविणारा, नैतिकदृष्ट्या आदर्श ऐतिहासिक स्वागतार्ह निर्णय आहे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athavale) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्व प्रमुख नेत्यांचे अभिनंदन केले आहे.
[read_also content=”भाजपाने अर्ज मागे घेतला, यातून वेगळा अर्थ काढू नये – शरद पवार https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-withdrew-the-application-no-different-meaning-should-be-drawn-from-this-sharad-pawar-337202.html”]
दरम्यान, या निर्णयाला बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआयने पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या नैतिक निर्णयबद्दल रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे. विजयी ठरणाऱ्या उमेदवार ऋतुजा लटके यांचेही रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे. आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराने अकाली निधन झाले होते. त्यांच्या पत्नी ही पोटनिवडणूक लढत आहेत. एखाद्या आमदारांचे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढत असेल तर सहानुभूती आणि नैतिकदृष्ट्या विचार करून निवडणूक बिनविरोध करण्याचा आदर्श निर्णय घेणे योग्य आहे. ही परंपरा महाराष्ट्रात पाळली जावी हीच अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली. दरम्यान अर्ज मागे घेण्याचा भाजपाचा निर्णय नैतिकदृष्ट्या योग्य व स्वागतार्ह निर्णय आहे, असे केंद्रीयमंत्री रामदास आठवले म्हणाले.