पुणे : देशातील विविध राज्य सरकारांच्या कारभारात आदर्श ठरत असलेल्या महाराष्ट्राच्या लोकाभिमुख ‘मविआ सरकार’च्या स्थिरतेत अडथळे निर्माण करत केंद्रीय यंत्रणांच्या आधारे सत्तेतील नेत्यांविरोधी कट-कारस्थाने करून महाराष्ट्रातील सरकारला जाणीवपूर्वक अर्ध-कालावधीतच पायउतार व्हावयास भाग
पाडल्यामुळे व शिवसेनेच्या आमदारांची फोडाफोडी केल्यामुळे व भाजपने २०१९ लाच मुख्यमंत्रिपदाचा शब्द देऊन ही शिवसेनेस फसवले.
या आरोपातून मुक्त होण्यासाठी व भाजप नेतृत्वाची ‘देशभर मलीन झालेली प्रतिमा’ सुधारण्याच्या नादात (अर्थातच ‘डॅमेज कंट्रोल’च्या प्रयत्नात) ‘सेनेच्या फुटीर गटाच्या’ नेत्यास मुख्यमंत्रिपद देण्याचा व त्याद्वारे ‘संपूर्ण शिवसेना हायजॅक’ करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याची टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी (Gopal Tiwari) यांनी केली.
तसेच माजी मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना सेनेकडे एकहाती सत्ता हवी असल्यास काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील सांगितले होते. पण उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थान देखील लगोलग सोडले होते. याचे स्मरण पुन्हा करून देत आहोत, असेही
तिवारी यांनी सांगितले.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दीघे यांच्या शिकवणीचा विजय आहे, असे शिंदे म्हणाले आहेत. तसेच सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाईल, अशी ग्वाहीदेखील शिंदे यांनी दिली.