Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election: मुंबईतील मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; निवडणूक आयोगाची कबुली

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादी विभाजनात गंभीर त्रुटी आणि गोंधळ कायम असल्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 26, 2025 | 11:04 AM
BMC Election: 11 lakh duplicate voters in Mumbai

BMC Election: 11 lakh duplicate voters in Mumbai

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार नावे
  • एका व्यक्तीचे नाव तब्बल 103 वेळा मतदारयादीत असल्याचा धक्कादायक खुलासा
  • 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत दुबार नावे हटवण्यासाठीची ही मोहीम
Mumbai Election: देशात अलीकडच्या काळात काही राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत मतदार यादीत मोठे फेरफार झाल्याचा आरोप केंद्रीय निवडणूक आयोगावर केला जात आहे. अशातच आता महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या सगळ्यात मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार नावे असल्याची धक्कादायक माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.दुबार नोंदींचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे मतदारयादी शुद्धीकरणासाठी मुंबई महापालिकेने अतिरिक्त वेळ मागितला आहे.

Mumbai Terror Attack : आग, धूर आणि रक्ताने माखलेली ती रात्र… ‘या’ देवदूतांमुळे वाचला ताजमध्ये अडकलेल्या लोकांचा जीव

विशेष म्हणजे, एका व्यक्तीचे नाव तब्बल 103 वेळा मतदारयादीत असल्याचा धक्कादायक खुलासा महापालिकेने केलाआहे. शहरात 4 लाख 33 हजार नागरिकांची नावे एकापेक्षा अधिक वेळा मतदारयादीत नोंदवली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेला दुबार मतदारांचा आरोप खरा ठरल्याची चर्चा आता मुंबईसह राज्यभराती सुरू झाली आहे.

मुंबईत दुबार मतदारांची संख्या चिंताजनकरीत्या वाढली आहे. निवडणूक यादीत तब्बल 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदली गेली असून त्यामुळे शहरातील दुबार मतदारांचे एकूण प्रमाण सुमारे 11 लाखांवर पोहोचले आहे. डुप्लीकेट मतदाराचे नाव नेमके किती वेळा नोंदवले गेले आहे, याबाबत प्रशासनाकडे स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हे गैरप्रकार तातडीने दुरुस्त करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने (BMC) विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत दुबार नावे हटवण्यासाठीची ही मोहीम शहरभर चालवली जाणार आहे. 24 वॉर्डांमधील निवडणूक कार्यालयांमार्फत सहाय्यक आयुक्त ही प्रक्रिया प्रत्यक्षात राबवणार असून, मतदारयादीतील त्रुटी तातडीने दूर करण्यावर भर दिला जाईल.

26/11 Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादी विभाजनात गंभीर त्रुटी आणि गोंधळ कायम असल्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. मतदारयादीतील चुका तातडीने दुरुस्त करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती.

निवडणूक आयोगाच्या कामकाजावर निशाणा साधत दोन्ही नेत्यांनी पत्रात म्हटले होते की, “मतदारयादीतील गोंधळ कायम ठेवण्याची आणि तो कधीही न सुटता अधिक गुंतागुंतीचा होत जाण्याची जी सातत्यपूर्ण प्रवृत्ती निवडणूक आयोगाने दाखवली आहे, त्याबद्दल अभिनंदन करावे की खेद व्यक्त करावा, हेच समजत नाही. पण एक गोष्ट मात्र पुन्हा स्पष्ट झाली—मतदारयादीतील घोळ जसाच्या तसा ठेवण्यात आला आहे.”

 

Web Title: Bmc election 11 lakh duplicate voters in mumbai big mess in the list too admits election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • BMC Election 2025
  • Marathi News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला जगदंबा कशी जाणार सामोरी? ‘आई तुळजाभवानी’चा पहा महा एपिसोड
1

महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला जगदंबा कशी जाणार सामोरी? ‘आई तुळजाभवानी’चा पहा महा एपिसोड

Maharashtra News: महाराष्ट्राची प्रतिमा धुळीला; महिला अत्याचार, भ्रष्टाचारानंतर कर्जबाजारीपणातही राज्य अव्वल
2

Maharashtra News: महाराष्ट्राची प्रतिमा धुळीला; महिला अत्याचार, भ्रष्टाचारानंतर कर्जबाजारीपणातही राज्य अव्वल

26/11 Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम
3

26/11 Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित
4

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.