Karjat News : शेलू येथील मंदिरातील दान पेटी फोडणारा बालक पोलिसांच्या हाती
संतोष पेरणे: आजकाल मंदिरातील दानपेट्यांची चोरी ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. देशभरात अशा घटना वाढताना दिसत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडली आहे. शेलू गावातील एका प्रसिद्ध मंदिरात अज्ञात चोरट्याने दानपेटी पळवली आहे. चला या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कर्जत तालुक्यातील शेलू गावातील आर्या परेडाईज या सोसायटी मधील गणेश मंदिरातील दान पेटी पळवून नेल्याची तक्रार नेरळ पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे त्या चोरट्याचा शोध घेण्यात नेरळ पोलिसांना यश आले असून दान पेटी चोरून नेणाऱ्या विधी संघर्षात बालकाला पकडण्यात आले असून त्याची रवानगी न्यायालयाने बालसुधार गृहात करण्यात आली आहे.
शेलू गावातील बांधिवली रस्त्याकडे असलेल्या आर्या परिडाइज या गृह संकुलात श्री गणेश मंदिर आहे. मे महिन्यात त्या मंदिरात श्रीची पूजा आणि उत्सव सोसायटीने आयोजित केला होता. त्यावेळी त्या गणेश मंदिरातील स्टीलची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली होतो. त्याबाबत नेरळ पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्र- 74/2025 BNS कलम 305(अ) प्रमाणे दिनांक 05/05/2025 रोजी सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा हा गणपती मंदिरातील दानपेठी चे चोरी संदर्भात होता.त्यामध्ये स्टिलची दानपेठी आणि अंदाजे 30 हजार रक्कम चोरी झाल्याचे तक्रारी मध्ये नमुद केले होते. गुन्ह्याच्या तपासात त्या भागातील सीसीटिव्ही कॅमेरे यांची मोठी मदत झाली आणि सदर गुन्ह्याचा तपास CCTV कॅमेराच्या माध्यमातून करून गुन्ह्यामध्ये एक १५ वर्षाचा अल्पवयीन मुलगा रा. शेलू याने केला असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानुसार त्याचे पालक यांना विश्वासात घेऊन गुन्ह्यातील चोरी केलीली दानपेठी आणि 20 हजारांची रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरु आहे.
यंदा दगडूशेठ गणपतीला पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा; मंदिर सजावटीचे वासापूजन संपन्न
पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई यांच्या प्रयत्नांना यश आले असून दानपेटी सह रक्कम पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी त्या बालकांची माहिती न्यायालयाला दिली असता त्या बालकाला बालसुधार गृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.