Local Body Election 2025: मिनी विधानसभा निवडणुकांसाठी महायुती सज्ज; इलेक्शनसाठी नऊ महत्त्वाचे टार्गेट
महायुतीकडून जिल्हा पातळीवर तीन मंत्र्यांची समिती स्थापन केली जाईल.
जिल्हा समितीत पालकमंत्री तसेच दोन्ही पक्षांचे आमदार आणि नेतेही समाविष्ट असतील.
आज जिल्हा पातळीवरील समित्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
समिती ८ दिवसांत सविस्तर अहवाल तयार करेल.
अहवालात जिल्ह्यातील राजकीय स्थिती आणि महायुतीच्या पक्षांची ताकद यावर प्रकाश टाकला जाईल.
महायुतीतील वादांची सविस्तर माहिती देखील अहवालात दिली जाईल.
जिल्हा समन्वय समितीचा अहवाल नंतर राज्य समितीसमोर मांडला जाईल.
वाद उद्भवणाऱ्या जागा आणि कारणांवर महायुतीचे मुख्य नेते निर्णय घेतील.
जाहीर तणाव निर्माण होणार नाही याची देखभाल राज्य समन्वय समिती करेल.