रायगड रिकामा करा! 7 पिढ्यांपासून राहणाऱ्या नागरिकांना पुरातत्व खात्याकडून गड सोडण्याच्या नोटीसा
रायगड किल्ल्यावर ७ पिढ्यांपासून राहणाऱ्या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. रायगड राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून संरक्षित आहे. त्यामुळे एएसआयच्या नियमानुसार गडावर कोणतंही अतिक्रमण किंवा नवं बांधकाम बेकायदेशीर ठरवण्यात येतं. त्यामुळे धनगर वस्तीतील लोकांना नोटीस पाठवली असून गड रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Matheran News : पर्यटकांसाठी ई रिक्षा सज्ज ; पारंपरिक रिक्षाचलाकांकडून मात्र विरोध
रायगडावर बाजारपेठ आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या खालच्या परिसरात धनगर समाजाची घरं आहेत. झोपडीवजा असलेल्या या घरातील लोक गेल्या कित्येक पिड्या गडावर वास्तव्यास आहेत. गडावर येणाऱ्या पर्यटकांना दूध, दही, ताक, चहा, नाश्ता आणि जेवण पुरवतात. यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
दरम्यान याधीही २०११ मध्ये धनगर वस्तीला अशीच नोटीस देण्यात आली होती. नोटीसीला स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमी संघटनांकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे नोटीस मागे घेतली होती. आता पुन्हा धनगर वस्ती रिकामी करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुले स्थानिकांमधून विरोध करण्यात येत आहे.
”गेल्या ७ पिढ्यांपासून आम्ही गडावरच राहात आहे. रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना दूध, दही, ताक, जेवण देऊन आमचा उदरनिर्वाह चालतो. आमचं संपूर्ण जीवनट रायगडावर अवलंबून आहे”, अशा भावना स्थानिकांनी व्यक्त केल्या.