फोटो सौजन्य- pinterest
बुधवार, 8 ऑक्टोबरचा दिवस काहींसाठी चढउताराचा तर काहींसाठी सामान्य राहील. तसेच चंद्र आज दिवसरात्र मेष राशीमध्ये संक्रमण करणार आहे. जो ग्रह मंगळाच्या राशीत असल्याने धन योग तयार होईल. चंद्रापासून पाचव्या घरात शुक्राची उपस्थिती देखील शुभ योग तयार करेल. ज्योतिषशास्त्रानुसार अश्विनी नक्षत्राच्या संयोगामुळे सर्वार्थ सिद्धि योग आणि अमृत सिद्धि योग हे शुभ योग देखील तयार होतील. आजचा दिवस मेष, कर्क, सिंह, तूळ आणि मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहील. धन योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. चंद्र तुमच्या राशीत असल्याने बुद्धिमत्तेद्वारे आणि हुशारीने तुम्हाला लाभ मिळेल. तसेच आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. त्यासोबतच तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. या काळात तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. यावेळी दीर्घकालीन गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. करिअर आणि कामाच्या बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. यावेळी तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी मिळतील. तुम्ही नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकता. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. जे नोकरी बदलण्याच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होईल.
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांना प्रगतीची संधी मिळेल. तुमच्या कामामध्ये तुम्ही प्रगती करु शकता. जर तुम्ही मुलाखत दिली असेल किंवा स्पर्धेमध्ये भाग घेतला असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होताना दिसतील. अनावश्यक खर्च करणे टाळा. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. राजकारण आणि सामाजिक कार्यात सहभागी असलेल्यांना अपेक्षित पाठिंबा मिळेल.
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. जर तुमचे एखाद्या ठिकाणी पैसे अडकले असल्यास ते तुम्हाला परत मिळतील. तुम्हाला एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकाकडून फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. यावेळी तुम्हाला तुमच्या वडिलांकडून लाभ होऊ शकतो. जर तुम्ही वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मित्राकडून अपेक्षित असलेला पाठिंबा मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)