कल्याण : टँकर चालकाने (Tanker Driver) वेळीच प्रसंगावधान (Alert) राखत दाखवलेल्या समय सुचकतेमुळे कल्याण पूर्वेत (Kalyan East) एक मोठा अपघात टळला. रस्त्याच्या उतारावर टँकरचा ब्रेक फेल (Tanker Break Failure) झाल्याचे लक्षात येताच चालकाने हा टँकर थेट डिव्हायडरवर चढवला (The tanker drove directly onto the divider) आणि पुढची मोठी दुर्घटना टळली.
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहर सुशोभीकरणांतर्गत रस्त्याच्या दुभाजकांमध्ये शोभेची झाडे लावली आहेत. या झाडांना दररोज टँकर किंवा टेम्पोच्या माध्यमातून पाणी टाकण्याचे काम केले जाते. कल्याण पूर्वेतील काटेमानवली परिसरात असणाऱ्या पुन्हा लिंक रोडवर लिंक रोडवरील दुभाजकांमधील झाडांना आज सकाळी नेहमीप्रमाणे पाणी घालण्याचे काम सुरू होते. त्यावेळी हा टँकर ड प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरील उतारावर आला. आपल्या टँकरचे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले आणि चालकाच्या मनात एकच धस्स झालं. परंतु त्याने घाबरून न जाता प्रसंगावधान दाखवत ज्या डिव्हायडर वरील झाडांना पाणी टाकत टाकण्याचे काम सुरू होते, त्याच डिव्हायडरवर हा टँकर चढवला आणि पुढची मोठी दुर्घटना टाळली.
[read_also content=”हा विचार रुजायला हवा! लग्नाच्या दिवशी नववधूने आधी पार पाडले परीक्षेचे कर्तव्य, त्यानंतरच… https://www.navarashtra.com/education/education-priority-ashwini-mhaskar-student-of-jeevandeep-college-goveli-university-of-mumbai-first-prefered-exam-then-got-merried-nrvb-384642.html”]
टँकर चालकाच्या या समय सूचकतेमुळे अनेकांचा जीव मोठा अपघात होता होता वाचल्याने नागरिकांनी या टँकर चालकाचे कौतुक केले आहे. कल्याण पूर्वेतील लिंक रोड हा एक महत्त्वाचा रस्ता असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहनांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी मोठा अभ्यास होण्याची शक्यता होती. परंतु टँकर चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.
[read_also content=”घटस्फोटित नोकरदार स्त्रियाही मुलांचा सांभाळ करू शकतात, मूल दत्तक घेण्याचा त्यांनाही अधिकार; उच्च न्यायालयाचे निरीक्षण https://www.navarashtra.com/maharashtra/divorced-working-women-can-also-take-care-of-children-right-to-adopt-child-observes-high-court-nrvb-384619.html”]