कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण (फोटो- सोशल मिडिया)
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात १२ आरोपींची सुटका
हायकोर्टाने ३ आरोपींना दिला दिलासा
मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर बेंचचा निर्णय
Govind Pansare Murder Case: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने १२ आरोपींची सुटका केली आहे. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांना अटक केली होती. दरम्यान आज मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सर्व आरोपीना जामिन मंजूर केला आहे.
गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विरेन्द्रसिंह तावडे, शरद कळसकर, अमोल काळे यांना कोल्हापूर सर्किट बेंचने जामिन मंजूर केला आहे. या हत्या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली होती. या आधी ९ जणांना जामिन मंजूर झाला होता. विरेन्द्रसिंह तावडे, शरद कळसकर, अमोल काळे यांना जामिन मिळाला नसल्याने ही तिघे तुरुंगातच होते.
विरेन्द्रसिंह तावडे, शरद कळसकर, अमोल काळे त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जामिनावर कोल्हापूर सर्किट बेंच येथे सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये कोर्टाने तिघांना जामिन मंजूर केला आहे. २०१५ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तब्बल १२ जणांना अटक करण्यात आली होती. या आधी ९ जणांना जामिन मंजूर करण्यात आला होता. तर आता कोल्हापूर बेंचने उर्वरित तीन जणांना देखील जामिन मंजूर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील सर्व संशयित आरोपीना जामिन मंजूर करण्यात आला आहे.