हरित यशोगाथा २०२५ (फोटो- सोशल मीडिया)
३० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्कृष्ट हवामान कार्याचा गौरव
माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत कार्यक्रम
मुंबई “क्लायमेट वीक” व त्या अंतर्गत भागीदारीची घोषणा
मुंबई: राज्यातील ३० स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरण आणि वातावरणीय बदल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “हरित यशोगाथा २०२५” या सन्मानाने गौरविण्यात आले. ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ-गव्हर्नमेंट (एआयआयएलएसजी), मुंबई, पर्यावरण व हवामान बदल विभाग, महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आयफॅट इंडिया २०२५, गोरेगाव येथे हा कार्यक्रमात पार पडला.
हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाद्वारे चालविलेल्या “माझी वसुंधरा अभियान”वर आधारित असून, शहरांची पर्यावरणीय जबाबदारी आणि सामाजिक वर्तन बदलण्यासाठी भर देण्यात येतो. राज्यव्यापी स्पर्धेद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियानाच्या पाच प्रमुख विषयांवर- पाणी, ऊर्जा, वायू, पृथ्वी आणि ऑल-राऊंडर उपक्रम सादर केले. एआयआयएलएसजी हे या वर्षी शतकीय महोत्सव साजरा करत आहे.
हा कार्यक्रमाला डॉ. जयराज फाटक भाप्रसे (सेवानिवृत्त), महासंचालक, अभास्थास्वसं, डॉ. कैलास शिंदे भाप्रसे , महानगरपालिका आयुक्त, नवीमुंबई महानगर पालिका, महाराष्ट्र, डॉ. राधाबिनोद शर्मा, महापालिका आयुक्त, मीरा भाईंदर महानगरपालिका, महाराष्ट्र, श्री. संजय सिंह, प्रमुख, युनिसेफ, श्री. सुधाकर बोबडे, अभियान संचालक, माझी वसुंधरा अभियान, महाराष्ट्र शासन, श्री. अभिजित घोरपडे, संचालक, राज्य वातावरणीय कृती कक्ष, महाराष्ट्र शासन, श्रीमती. उत्कर्षा कवडी, वरिष्ठ कार्यकारी संचालिका, सेक्रेटरीएट, महाराष्ट्र वॉश एन्वायरन्मेंटल सॅनिटेशन कोएलिशन अभास्थास्वसं, मुंबई यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
स्थानिक स्वराज्य संस्थांना या कार्यक्रमाच्यानिमित्ताने पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली धोरणात्मक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरण विषयक माहिती, तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर लागू करण्यासाठी, नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
यामध्ये मुंबई “क्लायमेट वीक” व त्या अंतर्गत भागीदारीची घोषणा करण्यात आली. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई आणि शिशिर जोशी संस्थापक, प्रोजेक्ट मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई आणि वायएजी यांच्यामध्ये “लॉकलाइझिंग प्लास्टिक एक्शन थ्रू कम्युनिटीज” अंतर्गत सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर युनिसेफ महाराष्ट्र आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई येथील लेखक यांचे योगदान असलेल्या “वॉटर अॅण्ड एनर्जी सिस्टिमः बिल्डिंग फॉर क्लायमेट रिझिलियन्स अॅण्ड एन्व्हायर्मेंटल सस्टेनिबिलीटी” या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.