GE Aerospace Pune: जीई ऐरोस्पेसच्या पुण्यातील उत्पादन सुविधेने साजरी केली कार्यसंचालनाची 10 वर्षे (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
GE Aerospace Pune Marathi News: आज जीई ऐरोस्पेसच्या पुण्यातील उत्पादन सुविधेने कार्यसंचालनांची दहा वर्षे साजरी केली, जो भारतातील विमान वाहतूक उद्योगामधील कंपनीच्या चार दशकांच्या इतिहासामधील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. गेल्या दशकभरात पुणे व्यावसायिक जेट इंजिन कम्पोनण्ट्सच्या उत्पादनासाठी हब आणि प्रगत उत्पादन कौशल्य विकासासाठी केंद्र म्हणून उदयास आले आहे, जेथे त्यांच्या अॅप्रेन्टिस आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून ५,००० हून अधिक उत्पादन सहयोगींना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
“आम्ही पुण्यामध्ये आमची फॅक्टरी सुरू केली तेव्हा आमच्याकडे ऐरो -इंजिन परिसंस्था नव्हती. दहा वर्षांनंतर आम्ही जागतिक दर्जाचा उत्पादन कौशल्य आधार निर्माण करण्यासोबत मोठ्या ऐरोस्पेस क्षेत्राप्रती योगदान देखील दिले आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये उच्च-स्तरीय उत्पादन व कौशल्यासाठी विकसित केलेल्या स्थानिक क्षमतेचा मला अभिमान वाटतो,” असे जीई ऐरोस्पेसच्या ग्लोबल मॅन्युफॅक्चुरिंग ऑपरेशन्स अँड सप्लाय चेनचे कार्यकारी संचालक अमोल नागर म्हणाले.
पुण्यातील उत्पादन सुविधा सीएफएमच्या लीप (LEAP), जीईएनएक्स आणि जीई९एक्स इंजिन्ससाठी कम्पोनण्ट्स उत्पादित करते, जे जगभरातील कारखान्यांमध्ये ग्राहकांच्या वाढत्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी वापरले जातात. या सुविधेच्या यशाला जीई ऐरोस्पेसचे प्रोप्रायटरी लीन ऑपरेटिंग मॉडेल फ्लाइट डेकचे पाठबळ आहे, जे सुरक्षितता, दर्जा व कार्यक्षमतेला प्राधान्य देते.
फ्लाइट डेक तैनात करत आणि शॉप फ्लोअरवरील कर्मचाऱ्यांच्या १,००० हून अधिक शिफारशींचा फायदा घेत या सुविधेने अपव्यय कमी केला आहे, प्रक्रिया कार्यक्षमता वाढवली आहे आणि आऊटपूट वाढवले आहे, तसेच शॉप-फ्लोअरवरील सुरक्षितता सुधारली आहे. महत्त्वपूर्ण कम्पोनण्टसाठी नवीन मॉडेल लाइनसह या सुविधेने कमी लीड टाइम शक्य केला आहे, त्याच टीमसोबत उत्पादकता वाढवली आहे आणि डाऊनटाइम कमी केला आहे. ती लाइन आता सहा तिमाहींपेक्षा अधिक कालावाधीदरम्यान करण्यात आलेल्या अनेक सुधारणांच्या मदतीने दुप्पटीहून अधिक पार्ट्सची निर्मिती करते.
“पुण्यातील कम्पोनण्ट्स आमच्या जागतिक कारखान्यांमध्ये वापरले जातात, जेथे ते सीएफएमचे लीप, जीईएनएक्स आणि जीई९एक्स इंजिन्स डिझाइन करण्यासाठी वापरले जातात. आम्हाला सुरक्षितता आणि दर्जावर लक्ष केंद्रित करण्यासह आमच्या फ्लाइट डेक प्रोप्रायटरी लीन ऑपरेशन्स मॉडेलचा वापर करून जगभरातील ग्राहकांना सेवा देण्यास आणि त्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्याचा आनंद होत आहे,” असे जीई ऐरोस्पेसच्या पुण्यातील उत्पादन सुविधेचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजीत सिंग म्हणाले.
उत्पादनाव्यतिरिक्त पुण्यातील सुविधेने अभियांत्रिकी टॅलेंटला अचूक उत्पादनामध्ये प्रशिक्षण देत शक्तिशाली स्थानिक ऐरोस्पेस कर्मचारीवर्ग निर्माण केला आहे. दरवर्षी नवीन बॅचेसमधील डिप्लोमा इंजीनिअर्सना वर्ग व शॉप फ्लोअर प्रशिक्षणामधून जावे लागते, त्यांना ऐरोस्पेस उत्पादन सुरक्षितता व दर्जाच्या उच्च मानकांचा अनुभव दिला जातो. जीई ऐरोस्पेस अर्ध-वेळ पदवीधर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना देखील प्रायोजित करते, ज्यामुळे इंजीनिअर्सची प्रतिभावान टीम तयार होते. आज, पुणे सुविधेमध्ये ३०० हून अधिक असे इंजीनिअर्स काम करत आहेत, तर इतर भारतातील ऐरोस्पेस क्षेत्रात सकारात्मक परिणाम घडवून आणत आहेत.
पर्यावरणीय स्थिरता हा पुणे सुविधेचा हॉलमार्क आहे. ही सुविधा ISO14001 आणि ISO45001 प्रमाणित आहे, जेथे ३० टक्के ऊर्जा वापर नवीकरणीय स्रोतांमधून केला जातो.