राज्याच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या भारत राष्ट्र समिती पक्षाला (बीआरएस) राज्यात पहिलं यश मिळालं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) गुरुवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला आहे. गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. गफार सरदार पठाण असं बीआरएसच्या (BRS) विजयी उमेदवाराचं नाव आहे.
[read_also content=”घराला टाळं ठोकून सहा महिन्यांपासून लपून बसला होता भामटा ज्वेलर्स, पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन ठोकल्या बेड्या https://www.navarashtra.com/maharashtra/dombivali-police-arrested-man-hidden-in-his-locked-home-nrsr-401516.html”]
विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बीआरएस पक्षाची जाहीर सभा झाली होती. बीआरएस पक्षाला राष्ट्रीय स्तरावर वाढवण्यासाठी के.चंद्रशेखर राव यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. दरम्यान यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सभाही घेतल्या होत्या. आगामी सर्वच निवडणुका लढवणार असल्याचा निर्णय या पक्षाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी झालेल्या ग्रामपंचायतीसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत देखील बीआरएस पक्षाचे कार्यकर्ते रिंगणात उतरले होते. तर गुरुवारी (18 मे) झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज हाती आले असून छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसचं उमेदवार विजयी झाला आहे. गफार सरदार पठाण असं बीआरएसच्या विजयी उमेदवाराचं नाव आहे. विशेष म्हणजे राज्यातील बीआरएस पक्षाचा हा पहिला विजय असल्याचं सांगितलं जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच 288 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचं दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. नांदेड शहरातील अनंता लॉन्स येथे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 19 ते 20 मे असे दोन दिवसीय हे शिबीर असणार असून, यासाठी स्वतः के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
के. चंद्रशेखर राव यांच्याकडून राज्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी त्यांनी नांदेडला दोन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अशा तीन जाहीर सभादेखील घेतल्या आहेत. तर राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. तर अनेक माजी आमदार, खासदार यांच्यासह इतर पक्षातील महत्वाच्या नेत्यांचा देखील बीआरएसमध्ये प्रवेश होत आहे. तर आगामी काळात देखील असेच प्रवेश दिले जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात बीआरएसकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे.






