फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Big changes in the Sri Lankan team : टी-२० विश्वचषकापूर्वी खेळाडूंच्या दुखापतींची मालिका अखंड सुरूच आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. टी-२० विश्वचषकाच्या दोन दिवस आधी हर्षित राणा देखील दुखापतग्रस्त झाला होता आणि त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संघात समाविष्ट करण्यात आले होते. आता श्रीलंकेच्या संघामधून विश्वचषक सुरू होण्याच्या एक दिवसाआधी मोठी अपडेट समोर आली आहे. श्रीलंकेचा स्टार गोलंदाज इशान मलिंगा देखील दुखापतीमुळे बाहेर पडला आहे आणि त्याच्या जागी आता अधिकृतपणे संघाची घोषणा करण्यात आली आहे.
विश्वचषकापूर्वी, श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली. दुसऱ्या सामन्यादरम्यान, मलिंगाला खांद्यात वेदना जाणवल्या. गोलंदाजी केल्यानंतर तो कोसळला आणि तिसऱ्या टी-२० सामन्यातून बाहेर पडला. या दुखापतीमुळे त्याचे टी-२० विश्वचषक खेळण्याचे स्वप्नही भंगले आहे, कारण तो आता संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे.
श्रीलंकेच्या संघाने आता इशान मलिंगाच्या जागी खेळाडूची घोषणा केली आहे. त्याच्या जागी प्रमोद मदुशनची निवड करण्यात आली आहे. प्रमोदने आतापर्यंत श्रीलंकेसाठी एकूण आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी १८.८३ आहे. हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जवळजवळ तीन वर्षांनी संघात परतत आहे. इशानची अनुपस्थिती जाणवू नये याची खात्री तो करेल अशी अपेक्षा आहे. श्रीलंकेचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे हा सामना 8 फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल.
Eshan Malinga will miss the tournament due to injury. The Technical Committee approves the inclusion of Pramod Madushan in the Sri Lanka squad. pic.twitter.com/7NBMs4Rkru — Sri Lanka Tweet 🇱🇰 (@SriLankaTweet) February 6, 2026
श्रीलंकेच्या संघात झालेल्या बदलांनंतर, इशान मलिंगाच्या जागी प्रमोद मदुशनला संधी देण्यात आली आहे. टी-२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा अद्ययावत संघ:
दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, कामिल मिश्रा, कुसल मेंडिस, कामीडू मेंडिस, कुसल जेनिथ परेरा, चारिथ असलंका, जेनिथ लियानागे, पवन रथनायके, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, दुष्मंथेरा, मदशिरा, प्रशांत चतुर्थी, पवन रथनायके.






