Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करा,जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे निर्देश

Shetkari Karj Mukti Yojana 2026: बुलढाणा जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक क्रमांकासह जवळच्या महा-ई-सेवा किंवा सीएससी केंद्रावर जाऊन मोफत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने आवाहन केल

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 30, 2026 | 02:48 PM
शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करा,जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे निर्देश
Follow Us
Follow Us:
  • शेतकरी कर्जमुक्ती योजना
  • शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करा
  • जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे निर्देश
बुलढाणा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा लाभ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जलदगतीने मिळावा, यासाठी प्रशासनाने वेगाने पावले उचलली आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी आपला ‘अॅग्रीस्टॅक’ क्रमांक सोबत घेऊन जवळच्या महा-ई-सेवा किंवा सीएससी केंद्रांवर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) त्वरित पूर्ण करावे. ही संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी १००% मोफत असून, योजनेचे काम विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी दिले.

Buldhana News: कपाशीपेक्षा सोयाबीनचाच दबदबा, राज्यात सर्वाधिक ३७.८% क्षेत्र व्यापले, सरासरी ८२ टक्के पेरणी

ही पहिली यादी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तलाठी कार्यालये, विकास सोसायट्या आणि बँकांच्या शाखांमध्ये सर्वांना दिसेल अशी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे या पहिल्या यादीत नाहीत, त्यांनी अजिबात काळजी करू नये, त्यांची नावे पुढील यादीत नक्की येतील, अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपले बैंक खाते व कर्जमाफीची रक्कम तपासून मोफत आधार प्रमाणीकरण करावे. ई-सेवा केंद्र चालकांना शासनाकडून मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यांना कोणतेही शुल्क देऊ नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच माहितीत काही चूक वाटल्यास शेतकऱ्यांनी थेट पोर्टलवर तक्रार नोंदवावी, प्रशासकीय समिती ती तत्परतेने सोडवून न्याय देईल.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा कार्यालयातील जिजाऊ सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कवळे, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, बँक संजय खडसे (सिंदखेड राजा), रवींद्र जोगी (मेहकर), अग्रणी व्यवस्थापक शैलेंद्र सिंह, महा आयटीचे प्रसन्न बोरकर आणि बीडीसीसीचे आर. टी. मस्के प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच, दृक्श्राव्य प्रणालीद्वारे (व्हीसी) जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहायक निबंधक व तालुका कृषी अधिकारी जोडले गेले होते. प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून ही योजना यशस्वी करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

केंद्रे तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना

शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली. ज्या गावांमध्ये सध्या एकही आधार प्रमाणीकरण केंद्र नाही, तेथे तातडीने नवीन केंद्रे सुरू करण्याच्या आणि ग्रामपंचायतींमधील बंद असलेली केंद्रे तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्याऱ्यांनी या मोफत व सोप्या सुविधेचा लाभघ्यावा, जेणेकरून कर्जमाफीचा मार्ग लवकर मोकळा होईल.

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना

Web Title: Buldhana shetkari karj mukti yojana 2026 ekyc aadhaar authentication update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • agricultural loans
  • buldhana news
  • Farmer Loan Waiver

संबंधित बातम्या

Buldhana News: सोयाबीनची झाडे फेकले जिल्हा कचेरीपुढे, शेतकरी संघटनेचा एल्गार; हेक्टरी १ लाखाच्या नुकसानभरपाईची मागणी
1

Buldhana News: सोयाबीनची झाडे फेकले जिल्हा कचेरीपुढे, शेतकरी संघटनेचा एल्गार; हेक्टरी १ लाखाच्या नुकसानभरपाईची मागणी

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती
2

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती

Buldhana News: १३ लाख ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ; मोफत प्रवासामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलले
3

Buldhana News: १३ लाख ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ; मोफत प्रवासामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

Buldhana News: कोवळ्या पिकावर वन्यप्राण्यांचा ताव; पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची रखवाली,  संकटात आणखी भर
4

Buldhana News: कोवळ्या पिकावर वन्यप्राण्यांचा ताव; पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची रखवाली, संकटात आणखी भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.