Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: लोणारची कामे दर्जेदार करा; पर्यटकांच्या सुविधांवर भर द्या, विभागीय आयुक्त नयना गुंडेंचे निर्देश

Lonar Lake Development Buldhana: बुलढाण्यातील जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराच्या विकासकामांचा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 27, 2026 | 06:27 PM
Lonar Lake Development Buldhana

Lonar Lake Development Buldhana

Follow Us
Follow Us:
  • लोणारची कामे दर्जेदार करा
  • विभागीय आयुक्त नयना गुंडेंचे निर्देश
  • बैठकीतील प्रमुख मुद्दे कामांना गती देण्याचे निर्देश
बुलढाणा: लोणार सरोवर हे जागतिक दर्जाचे विवर व पर्यटनस्थळ आहे. तेथील विकासकामात कुठलीही हयगय होऊ देऊ नका. कामांचा दर्जा उच्च ठेवा आणि वेळेत पूर्ण करा. देशी-विदेशी पर्यटकांसाठी निसर्गाचा समतोल राखून जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या, असे आदेश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी मंगळवारी लोणार येथे आढावा बैठकीप्रसंगी दिले.

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई

लोणार शहराच्या सर्वांगीण व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या लोणार विकास आराखड्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची पाहणी आयुक्तांनी केली. विविध विकासकामांची पाहणी केल्यानंतर सर्व संबंधित विभागांचा आढावा घेतला. बैठकीला आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी यशवंत नागुलवार, सहायक वनसंरक्षक अधिकारी चेतन राठोड, पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खाडे, तहसीलदार भूषण पाटील, माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक भूषण पाटील मापारी, प्रा. गाजनन खरात, तेजराव घायाळ यांच्यासह प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. विभागीय आयुक्तांनी लोणार सरोवर परिसर, पर्यटन सुविधांची कामे, रस्ते व मूलभूत सोयी-सुविधांशी संबंधित विविध विकासकामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कामाचा दर्जा आणि गतीची बारकाईने पाहणी केली. लोणारचा जागतिक पर्यटन नकाशावरील उंचावण्यासाठी दर्जा आणखी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आयुक्त गुंडे यांनी सांगितले.

बैठकीतील प्रमुख मुद्दे कामांना गती देण्याचे निर्देश

विकास आराखड्यातील प्रलंबित कामे तातडीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने मार्गी लावण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना देण्यात आले. पर्यटक सुविधांवर भर पर्यटकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. पर्यावरण संवर्धन: विकासकामे करताना लोणार सरोवराची पर्यावरणीय आणि वैज्ञानिकादृष्ट्या असलेली संवेदनशीलता व जैवविविधता जपण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. आंतरविभागीय समन्वय: सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आणि विकास आराखडा समितीने आपापसात उत्तम समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नगराध्यक्ष मीरा मापारींनी मांडल्या विविध समस्या

नगराध्यक्षा मीरा मापारी व भूषण पाटील मापारी यांनी आयुक्त नयना गुंडे यांना निवेदन देऊन लोणार सरोवरातील वाढत्या पाणी पातळीवर तात्काळ  उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच लोणार शहरातील पुरातन मंदिरापासून शंभर मीटरमध्ये येणाऱ्या गरीब गरजू नागरिकांना तत्काळ घरकुल  देण्यात यावे, शहरातील पाणीपुरवठा योजनेला वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.

Buldhana News : कचरा टाकणाऱ्यांवर आता १ हजारांचा दंड; मोताळा कचरा डेपो स्थलांतरित होणार, न.प.च्या बैठकीत निर्णय

Web Title: Lonar lake development buldhana nayana gunde tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news
  • lake

संबंधित बातम्या

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई
1

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई

Buldhana News : बुलढाण्याच्या सौंदर्याला कचऱ्याचा डाग; नागरिक दुषित वातावरणामुळे त्रस्त!
2

Buldhana News : बुलढाण्याच्या सौंदर्याला कचऱ्याचा डाग; नागरिक दुषित वातावरणामुळे त्रस्त!

Buldhana News: मेहकरमधील ४०० वर्षांचा ऐतिहासिक ‘कंचनी महाल’ दुर्लक्षित, संवर्धनाची मागणी
3

Buldhana News: मेहकरमधील ४०० वर्षांचा ऐतिहासिक ‘कंचनी महाल’ दुर्लक्षित, संवर्धनाची मागणी

Buldhana News: बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्त्या केल्या रद्द; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांना सीईओ गुलाबराव खरात यांचा दणका
4

Buldhana News: बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्त्या केल्या रद्द; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांना सीईओ गुलाबराव खरात यांचा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.