Washim Drought News
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. हातात मागण्यांचे फलक आणि घोषणा देत शेतकरी व मनसे पदाधिकारी मोचांत सहभागी झाले होते. बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल, देशमुख हॉस्पिटल, सिव्हिल लाईन, शासकीय विश्रामगृह मार्गे मोच्चों जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, जिल्ह्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागात पिकांना फटका बसला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच वाढता उत्पादन खर्च, महागडी खते बियाणे, मजुरी आणि मशागतीचा खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना पावसाच्या खंडामुळे संकट अधिक गडद झाले. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने केवळ पाहणी किंवा आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मदतीची कार्यवाही करावी. जिल्ह्यातील पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी करून तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, पीकविमा भरपाई मिळवून द्यावी, तसेच कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चादरम्यान मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, शासनाने – वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीची गांभीर्यान दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आठ दिवसांच्या आत शासनाने ठोस निर्णय घेतला नाही, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.
या मोर्चात कारंजा-मानोरा जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर, रिसोड मालेगाव उपजिल्हाध्यक्ष अतीश डहाळ, वाशिम-मंगरुळपीर उपजिल्हाध्यक्ष उमेश टोलमारे, कृषी सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल भाऊ राठोड, वाशिम तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष लक्ष्मण जाधव, रिसोड तालुकाध्यक्ष योगेश, मानोरा तालुकाध्यक्ष संतोष घोडे, मालेगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, कारंजा शहराध्यक्ष कपिल महाजन, मालेगाव कृषी सेना तालुकाध्यक्ष रवी पवार, वाशिम शहर उपाध्यक्ष गजानन इंगोले, उपशहराध्यक्ष आकाश लोलप यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद






