Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्रीमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार?, काल रात्री उशिरा शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यात वर्षावर बैठक, खाते वाटपावर म्हणाले…

अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. यानंतर ९ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. पण यांना कोणती खाती दयाची याबाबत अजून नक्की झाले नसल्यानं कालच्या बैठकीत यावर खलबतं झालं. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत काही फेरबदल होण्याची शक्यता आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 11, 2023 | 08:32 AM
मंत्रीमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार?, काल रात्री उशिरा शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यात वर्षावर बैठक, खाते वाटपावर म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत, तर अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत सगळ्यानाच उत्सुकता आहे. दरम्यान, काल रात्री (सोमवारी) उशिरा मंत्रीमंडळ विस्तार व खातीवाटप याबाबत शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात तब्बल दिड तास बैठक चालली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित होते (Shinde-Fadnavis-Pawar Meeting)

याच आठवड्यात मंत्रीमंडळ विस्तार

राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. यानंतर ९ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. पण यांना कोणती खाती दयाची याबाबत अजून नक्की झाले नसल्यानं कालच्या बैठकीत यावर खलबतं झालं. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. तसेच मंत्रीमंडळ विस्तार व खातीवाटप याबाबत शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात चर्चा होत असून, राजकीय घडामोडींना वेग आला असून, याच आठवड्यात किंवा पावसाळी अधिवेशनाच्या आधी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

अर्थ, ऊर्जा, गृहनिर्माण खाती राष्ट्रवादीकडे जाणार?

राष्ट्रवादीच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गट व भाजपातील काही नेते नाराज असल्याचं समजते. तसेच राष्ट्रवादी काही महत्त्वाची खाती मिळणार असल्यामुळं याचा फटका शिंदे गट व भाजपाला बसणार आहे. तसेच ज्यांच्याकडे अधिक खाती आहेत, त्यांच्याकडे एक किंवा दोनच खाती राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खाती राष्ट्रवादीला हवी असल्याची सुत्रांची माहिती आहे. तसेच अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, तसंच, क्रीडा आणि शिक्षण यापैकी एका खात्यावरही अजित पवार (Ajit Pawar) गटाचा डोळा असल्याचं समजतंय, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अजित पवारांनंतर शिंदे-फडणवीस यांच्यात बैठक

राष्ट्रवादीच्या (NCP) नऊ मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेऊन आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही ते बिन खात्याचेच मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला जातोय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार निघून गेल्यानंतर शिंदे-फडणवीस यांच्यात बैठक पडल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Cabinet expansion will happen this week late last night between shinde fadnavis and ajit pawar on annual meeting account allocation said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2023 | 08:32 AM

Topics:  

  • current maharashtra political news
  • Dilip Walase Patil
  • jayant patil
  • maharashtra
  • maharashtra politics today
  • Nationalist Congress Party
  • Prafull Pate
  • supriya sule

संबंधित बातम्या

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर
1

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार
2

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी
3

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान
4

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.