बारामतीत रेकॉर्डब्रेक पाऊस; इंदापूर तालुक्यातील १५० घरांमध्ये पाणी शिरलं
बारामती: बारामती तालुक्यासह इंदापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बारामती शहर तालुका व इंदापूर तालुक्यातील काही गावांमधील तब्बल १५० हून अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तर पाण्यामध्ये अडकलेल्या काही नागरिकांना प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले. बारामती शहरात एका दिवसात १८० तर आतापर्यंत ४८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
बारामती शहर व तालुक्यासहलगतच्या इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने हाहाकार माजवला. बारामती शहरात एका दिवसात १८० मिलिमीटर तर आत्तापर्यंत ३०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बारामतीची पावसाची सरासरी ४०० मिलिमीटर आहे, मात्र सरासरीच्या ९० टक्के पाऊस बारामती शहरात मेमध्येच झाला. बारामती शहरातील ७० घरांमध्ये पाणी शिरले असून यामध्ये २५ घरांची पडझड झाली आहे. बारामती शहरातील जवळची या ठिकाणी ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी वर निघालेला रिपेश सिंग हा व्यक्ती पाण्यामध्ये वाहून गेला, मात्र सुदैवाने त्याने ओढ्याच्या पात्रातील कडेला असलेल्या एका झाडाला पकडून ठेवले, बारामती नगरपालिका अग्निशमन दल व बारामती एमआयडीसी अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Mansoon Update : पावसाचा कहर, उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ आला
बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी काही घरांमध्ये पाणी शिरले होते, त्यामुळे पाण्याने वेढा दिल्याने अडकलेल्या नवनाथ देवकाते, पांडुरंग देवकाते, परशुराम देवकाते, अमोल देवकाते, अशा देवकाते, बापू नरूटे, किशोर देवकाते या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ढेकळवाडी या ठिकाणी देखील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्या ठिकाणच्या नागरिकांची सोय मंदिर व शाळेमध्ये करण्यात आली.
इंदापूर तालुक्यातील सणसर याठिकाणी देखील आणि त्यांच्या घरामध्ये पाणी गेले. निरगुडे येथील ४० घरांमध्ये, शेटफळगढे येथे १५, लाकडी येथे दोन घरामध्ये, चिखली येथे १४ , कुरवली तसेच तावशी या ठिकाणी देखील काही घरांमध्ये पाणी शिरले. इंदापूर तालुक्यातील जांब या ठिकाणी नीरा नदीच्या बंधाऱ्यावर काम करत असलेले दोन कामगार पोकलेन मशीन सह पुरामध्ये अडकले, त्यांना प्रशासन व पोलिसांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान बाहेरून आलेल्या नागरिकांना बंद वाहतुकीमुळे अडकून बसण्याची वेळ आली.