बिग बॉस मराठी ६ ग्रँड प्रिमियर, कोण आहेत स्पर्धक; Live Updates (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गेल्या बऱ्याच दिवसांपासून संपूर्ण देशात बिग बॉस मराठी ६ ची चर्चा सुरू आहे. रितेश देशमुख निवेदन करत असणारा शो नेहमीच चर्चेत असतो आणि यावेळी या शो मध्ये मराठी कलाकारांची आणि इन्फ्लुएन्सर्सची मोठी नावं असल्याची चर्चा रंगली आहे. ११ जानेवारीला ग्रँड प्रिमियर सोहळा आहे आणि आता अंदाज लावण्यात येणारी नावं कन्फर्म आहेत का हे पाहण्याची वेळ जवळ आलीये. दरम्यान यावेळी नेहमीप्रमाणे वेगळी थीम असणार आहे आणि त्यानुसारच घराचा सेट डिझाईन करण्यात आलाय.
11 Jan 2026 10:31 PM (IST)
विशाल कोटियन आणि ओमकार राऊत दोन हँडसम हंक बिग बॉसच्या घरात. विशाल कोटियन हिंदी मालिकांमध्ये आतापर्यंत काम करत आला आहे. दगडी चाळीतून आलेला विशालने आपले अनुभव शेअर केले. ओमकार राऊत हेअर स्टाईलिस्ट असून त्याने आपले अनुभवही सांगितले.
विशाल आणि ओमकार दोघे जाणार घरात
11 Jan 2026 10:21 PM (IST)
महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन राधा पाटील मुंबईकरने बिग बॉस मराठी ६ च्या घरात एंट्री. अनेक कार्यक्रमात राधा पाटील नृत्य सादर करते. गौतमी पाटीलला तोडीस तोड देणारी राधा पाटीलचे नाव चर्चेत होते. राधा पाटील घरात नक्की काय करणार हीच चर्चा आता सुरू झालीये.
11 Jan 2026 10:14 PM (IST)
युवा नेता असणारी दिव्या शिंदेने बिग बॉस घरात प्रवेश केलाय. अनेक चळवळीत सहभागी असणारी दिव्या सुनील शिंदेने आपल्या कामाबाबत सर्वांना माहिती दिली. जुन्नर तालुक्यातील ही मराठमोळी मुलगी काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
11 Jan 2026 10:08 PM (IST)
विदर्भमधून आलेला बॉडीबिल्डर रोशन भजनकर यांनी बिग बॉसमध्ये एंट्री केली. अमरावतीची शान असणारा हा बॉडीबिल्डरने आपला प्रवासही सांगितला. आपल्या बायको आणि मुलीची इच्छादेखील सांगितली आणि मेहनत करून आपण पुढे जात असल्याचंही सांगितलं.
11 Jan 2026 10:03 PM (IST)
रितेश देशमुखने राकेश बापट याच्यासह गप्पा मारताना मराठी प्रेक्षकांचे खूपच कौतुक केले आणि त्यांचे आभारही मानले. राकेशने मेहनतीचे दार निवडत घरात प्रवेश केलाय. दोघांनीही हिंदीतून सुरूवात करून नंतर मराठीत येण्याचा अनुभवही दोघांनी शेअर केले.
11 Jan 2026 09:58 PM (IST)
पहिला हिंदी चित्रपट ठरला होता रेकॉर्डब्रेक. राकेश बापट पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये. हिंदी OTT गाजवल्यानंतर राकेश आता मराठी बिग बॉसच्या घरात. हिंदी बिग बॉसमध्ये शमिता शेट्टीसह राकेशचं नाव जोडलं गेलं होतं. राकेशने आतापर्यंत इंडस्ट्रीत खूप काम केलंय. रितेशलादेखील हे नाव ऐकून धक्का बसलाय.
राकेश बापटची एंट्री
11 Jan 2026 09:50 PM (IST)
सातारा आणि कोल्हापुरचा बाज असणाऱ्या दोन्ही स्टार्स. रीलच्या आणि रियालिटी शो च्या स्टार असणाऱ्या रुचिता जामदार आणि अनुश्री माने या दोघींनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केलाय. या दोघींनी धमाकेदार डान्स करत रितेशसमोरच एंट्री केली.
रुचिता जामदार आणि अनुश्री मानेने घेतली एंट्री
11 Jan 2026 09:38 PM (IST)
पहिल्या इंडियन आयडॉलची प्रसिद्ध असणारी मराठमोळी प्राजक्ता शुक्रेने घरात केला प्रवेश. गेल्या वर्षी अभिजित सावंत आल्यानंतर आता प्राजक्तानेही एंट्री घेतली आहे. याआधी राहुल वैद्यने हिंदी बिग बॉस गाजवले आहे. त्यामुळे प्राजक्ताकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत.
प्राजक्ता शुक्रेने केला घरात प्रवेश
11 Jan 2026 09:30 PM (IST)
जालन्याचा इन्फ्लुएन्सर डॉन प्रभू शेळकेने घेतली बिग बॉस मराठी ६ मध्ये एंट्री, म्हणाला ओरडून बोलण्याची स्टाईलच आहे आपली. करण सोनावणेच्या फॉलोअर्सना दिली टक्कर.
11 Jan 2026 09:16 PM (IST)
'सोनावणे वहिनी' म्हणून सोशल मीडिया सुपरस्टार असणारा करण सोनावणेची क्लास एंट्री. मुंबई इंडियन्सपासून सर्वांना आपल्या कंटेटने आनंदी करणारा आणि मिलियन्समध्ये फॉलोअर्स असणारा करण पहिल्यांदाच रियालिटी शो मध्ये दिसतोय. करणला अनेक मोठे सुपरस्टारदेखील फॉलो करतात. करण सोनावणे येणार याची अटकळ होती आणि या यादीत त्याचं नाव होतं.
करण सोनावणेची धमाकेदार एंट्री
11 Jan 2026 09:01 PM (IST)
सुपरस्टार होण्याची स्वप्नं पाहणारी ही जोडी बिग बॉसच्या घरात एंट्री करण्यास तयार. आयुष संजीव आणि तनवी कोलते या दोघांनी बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे. दोघांनीही बॅकग्राऊंड डान्सर म्हणून सुरूवात करत आता दोघेही लीड रोलमध्ये काम करत आहेत. बिग बॉसमध्येही आयुषने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलंय.
आयुष संजीव आणि तन्वी कोलतेची एंट्री
11 Jan 2026 08:48 PM (IST)
फॅशन आणि स्टाईल आयकॉन असणारी सोनाली राऊतची स्टायलिश एंट्री. जगभरात सोनाली राऊतने रँप वॉक केला असून उज्वला राऊतची लहान बहीण आहे. सोनाली अनेक देशांमध्ये शो करते आणि तिची फॅशन इंडस्ट्रीत २० वर्षाच्या वर कामगिरी आहे. मराठमोळा असणारा हा चेहरा जगभरात प्रसिद्ध आहे.
सोनाली राऊतने याआधी बिग बॉस हिंदीमध्येही होती
11 Jan 2026 08:39 PM (IST)
अस्सल मातीतील आवाज असणारा सचिन कुमावत, खान्देश किंग जातोय बिग बॉसच्या घरात. 'केसावर फुगे' गाण्याने घराघरात पोहचलेला सचिन आता बिग बॉसच्या घरात. ऐरणी भाषेतील गाण्याने सचिनने प्रेक्षकांचे मन जिंकले. १४०० बिलियन व्ह्यू असणारे गाणे जगभरात प्रसिद्ध झालेय. ऐरणी मायबोलीला जगभरात ओळख देण्यासाठी हा प्लॅटफॉर्म निवडल्याचे सचिनने सांगितले.
सचिन कुमावतने खास गाणं सादर करत केली एंट्री
11 Jan 2026 08:28 PM (IST)
आतापर्यंत मराठी आणि हिंदीतून कॉमेडी करत सर्वांना जिंकून घेणारा अभिनेता सागर कारंडे बिग बॉसच्या घरात घालणार धिंगाणा. स्किट करत सागरने एंट्री घेतली आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. सागरने मिमिक्री करत आपला अभिनय दाखवला. पण सागर नक्की कसा आहे हे घरातच कळेल. सागरचे नावदेखील चर्चेत होते.
बिग बॉसचा दुसरा स्पर्धक सागर कारंडे
11 Jan 2026 08:16 PM (IST)
दिपाली सय्यदची ग्रँड एंट्री. 'मला जाऊ दे' गाण्यावर थिरकली दिपाली. अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाने सर्वांना आपलंंसं करणाऱ्या दिपालीने राजकारणही गाजवलं आहे. तिची एंट्री होणार हा अंदाज लावण्यात आला होता आणि पहिलीच तिने धमाकेदार एंट्री केली आहे. आता दिपाली कशी खेळणार बघावं लागेल.
दिपाली सय्यदची धमाकेदार एंट्री
11 Jan 2026 08:14 PM (IST)
ग्रँड प्रिमियरमध्ये पॉवर की लाऊन दार उघडण्यात येणार आहे. म्हणजे नक्की काय? यावर्षी नुसता कल्ला नाही तर सरप्राईजचा हल्लादेखील आहे. ग्रँड प्रिमियरला धमाकेदार सुरूवात
11 Jan 2026 08:13 PM (IST)
नेहमीप्रमाणे बिग बॉसचं घर अगदी आलिशान असल्याचं दिसून आलंय. पॉश वॉशरूम, क्लासी किचन, लिव्हिंग रूम आणि दारंच दारं. यावेळी हॉस्टेलसारखे बेड्स बनविण्यात आले आहे. नक्की अशी रचना का केली आहे ते आता लवकरच कळेल. कॅप्टनची रूम पाहून तर डोळेच दिपतील. या घराला आहेत बरेच गुप्तद्वार. रितेशने घडवली घराची टूर. इतकंच नाही तर यावेळी उलटापुलटा रूमही दिसून आले आहे. सगळंच वेगळं स्वरूप असल्याने आता प्रेक्षकांची उत्सुकताही ताणली गेली आहे.
11 Jan 2026 08:06 PM (IST)
यावेळी स्पर्धकांना घरात प्रवेशासाठी असणार दोन दारं. ज्याला सर्व काही पटकन हवंय त्यासाठी शॉर्टकट पण मेहनत करून आत जाणाऱ्याला जास्त चांगलं फळ मिळेल. झटपट मिळणाऱ्या गोष्टींमध्ये असणार ट्विस्ट. तर यामध्ये ट्विस्ट असणारच. बिग बॉसने रितेशलाच टाकलं बुचकळ्यात. रितेशने निवडलं मेहनतीचं दार.
11 Jan 2026 08:03 PM (IST)
रितेश देशमुखने ग्रँड एंट्री घेत ग्रँड प्रिमियरची सुरूवात केली आहे. 'ऐका दारावरची दस्तक' म्हणत रितेशने कमालीचा परफॉर्मन्स दिला. ए बिड्डा ये मेरा अड्डा गाण्यावर रितेशने धमाकेदार डान्स केला. भाऊचा धक्का आता दर शनिवार - रविवार प्रेक्षकांना दिसणार. एंटरटेनमेंटचा राजा आला म्हणत रितेश विलासराव देशमुख सर्वांच्या मनात घर करायला आलाय.
11 Jan 2026 07:54 PM (IST)
कोणत्याही स्पर्धकाच्या वागण्याला दुसऱ्या स्पर्धकाकडून तशीच प्रतिक्रिया या सीझनमध्ये मिळेल असा विश्वास रितेशला वाटतोय. यावेळी वेगळा खेळ असणार आणि स्पर्धकही मोठे असणार असा अंदाज लावला जातोय.
11 Jan 2026 07:47 PM (IST)
'जर चॅनलला बजेट परवडले, तरच मी आणि जिनिलिया या शोमध्ये सहभागी होऊ.' असे रितेशने मुलाखतीत मजेशीर पद्धतीने सांगितले. निवेदन करण्याचा रितेशचा दुसरा सीझन आहे. यापूर्वीचे ४ सीझन महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. रितेशचे निवेदन अनेकांना आवडले होते. यावेळी रितेश कशी शाळा घेणार पहावे लागणार आहे
11 Jan 2026 07:44 PM (IST)
चित्रपट निर्माता आणि आर्ट डायरेक्टर उमंग कुमार यांनी ४५ दिवसांत सेटची रचना केली आहे. ज्या ठिकाणी पूर्वी 'राईज अँड फॉल'चा सेट उभारला होता, त्याच ठिकाणी टीमने बिग बॉस मराठीचे घर बांधले आहे. यावेळची थीम कमालीची असून त्यानुसारच हा सेट उभारण्यात आलाय.
11 Jan 2026 07:40 PM (IST)
मराठी क्लस्टरचे उपाध्यक्ष सतीश राजवाडे म्हणाले की, ते खूप उत्साहित आहेत आणि या शोचे मोठे चाहते आहेत. याशिवाय याशिवाय चाहत्यांना अजिबात नाराज न करता १०० दिवस शो चालणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे.






