चंद्रपूर : अर्जुनी येथे नाना चिंधू पोईनकर (वय ६०) हा राहत होता. तर, ते चिवडा विकून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याचा मुलगा तुकाराम व पुतण्या रामचंद्र पोईनकर यांचे एका पानठेल्यावर भांडण झाले. पैशामुळे त्यांचा संभा बावणे (Sambha Bawane) याच्याशी वाद झाला. संभाने तुकाराम याला मारहाण केली. तर, त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईलाही शिविगाळ केली. या कारणाने तुकाराम याने रामचंद्र सोबत शेगाव पोलीस स्टेशन गाठले.
[read_also content=”महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, महागाईवर नियंत्रणाची गरज तर, सर्वसामान्य नागरिक हताश https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/inflation-cuts-the-pockets-of-the-common-man-while-the-need-for-control-of-inflation-the-common-man-is-desperate-nraa-256585.html”]
नाना पोईनकर यांनी ‘तुझा मुलगा तुकाराम कुठे आहे ?’, असा प्रश्न विचारत वाद सुरु केला. रागाच्या भरात नानाच्या डोक्यावर कुर्हाडीने वार केला. रक्तबंबाळ नाना जमिनीवर कोसळला. आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. नानाच्या मित्राने हा घटनाक्रम बघितला. आणि सभांचा पवित्र पाहून पळ काढला. गावातील पोलीस पाटील यांना माहिती देण्यात आली. मारोती जुंबाडे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी एपीआय कृष्णा तिवारी, पीएसआय इ. एस. मेंढे यांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात सादर केले.
[read_also content=”डॉक्टरनेच विकले सात लाखात नवजात बाळाला, नागपुरात सरोगसीच्या नावावर मोठी फसवणूक https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/doctor-himself-sold-seven-lakh-newborn-baby-a-big-scam-in-the-name-of-surrogacy-in-nagpur-nraa-256434.html”]
आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. रुई खैरी (नागपूर) येथे आरोपी कुटुंबासह राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी आपली ओळख लपवून गेल्या बावीस वर्षांपासून बंडू विठ्ठल बावणे या नावाने वावरत होता. सरकारी वकील मिलिंद देशपांडे यांनी पाच साक्षीदार तपासले. आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने या केसचा अंतिम निकाल लागला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी संभा बावणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.