Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur: चंद्रपुरात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष; 300 वाघांसह मानवी जीवितही धोक्यात

Chandrapur जिल्ह्यात सुमारे 300 वाघांसह मोठी वन्यजीव संख्या आहे. वनक्षेत्र अपुरे व मानवी हस्तक्षेप वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. 2025 मध्ये 49 जणांचा बळी गेला असून वाघांचाही मृत्यू वाढला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 03, 2026 | 03:59 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्ह्यात जवळपास 300 वाघ; वनक्षेत्र 42% पेक्षा अधिक.
  • 2025 मध्ये मानव-वन्यजीव संघर्षात 49 नागरिकांचा मृत्यू.
  • रेल्वेमार्ग व अधिवासातील हस्तक्षेपामुळे वन्यजीव धोक्यात.
चंद्रपूर: देशात वाघांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील अर्धे म्हणजेच ३०० च्या जवळपास वाघ आहेत. जिल्ह्यात असलेली वाघांची संख्या पाहता पाहिजे त्या प्रमाणात जंगले वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित राहिलेली नसल्याने वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस मानववस्तीकडे वाढत आहे.

परिणामी मानव-वन्यप्राणी संघर्षात वाढ झाल्याने वन्यप्राण्यांसह मानवी जीवन संकटात सापडलेले आहे. यावर शासनाकडून शाश्वत उपायोजनांची आवश्यकता निर्माण झालेली आहे. जिल्ह्याला नैसर्गिक वनसंपन्नतेचा वरदान मिळालेला असून त्यामुळे लाभलेली वन्यप्राणी ही जिल्ह्यातील मौलिक संपत्ती आहे. मात्र देशात वाघाच्या संवर्धनासाठी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात एकूण ४८४५.३० चौ.कि.मी. म्हणजे एकूण भौगालिक क्षेत्राच्या ४२.३४ टक्के वनक्षेत्र आहे. जिल्ह्यात जगातील वाघांच्या संख्येच्या ५ टक्के म्हणजेच ३०० च्या जवळपास वाघ आहेत.

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…

वाघांसह बिबट, हरीण, रानडुक्कर, चितळ, नीलगाय, रानगवे अशा अनेक प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाढत्या वन्यप्राण्यांच्या संख्येसह जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी पडत असल्याने मानव वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा शिरकाव होत असून त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे. परिणामी वाढत्या मानव वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी प्रशासनामार्फत पाहीजे त्या प्रमाणात ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र पकल्प हा वाघांच्या संवर्धनासाठी विकसीत करण्यात आला. यात पर्यटकांची संख्या वाढविण्याकडे लक्ष देण्यात आले. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेला मानव वन्यजीव संघर्ष, वन्यप्राण्यांचे मानववस्तीकढे होत असलेले स्थलांतर, वनांमध्ये होत असलेले अतिक्रमण, ताडोबा प्रकल्पात पर्यटनाच्या नावावर होत असलेल्या रिसॉर्टचे बांधकाम, वनात वाढत असलेला मानवी हस्तक्षेप अशा गोष्टींकडे वनविभागाने पाहिजे त्या प्रमाणात लक्ष न दिल्याने वन्यजीव संकटात सापडलेले आहेत. वन्यजीवांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राणी मानवस्तीकडे येत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झालेले आहे. परिणामी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवांचा बळी जाणे, वन्यप्राण्यांचा मृत्यू होणे अशा घटना नियमित झालेल्या आहेत. त्यामुळे वन्यजीव असलेल्या जिल्ह्यात वन्यप्राण्यांसह मानवजीवनही संकटात सापडलेले आहे.

वन्यप्राणी व मानवांची मृत्यूसंख्या
२०२५ या वर्षामध्ये मानव वन्यप्राणी संघर्षात एकूण ४९ नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. तर गत ५ वर्षामध्ये २०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. २०२६ वर्षातील जानेवारी फेब्रवारी महिन्यात ६ नागरिकांचा जीव गेला. तर २०२५ मध्ये १२ वाघ आणि ५ बिबटांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक वन्यप्राण्यांचा जीव गेलेला आहे. दिवसेंदिवस मानवासह वन्यप्राण्यांची मृत्यूची संख्याही वाढत आहे.

रेल्वेमार्ग ठरतोय वन्यप्राण्यांसाठी जीवघेणा
बल्लारशा गोंदिया हा रेल्वेमार्ग दक्षिण विदर्भातील वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. गतवर्षभरात रेल्वेच्या धडकेत अनेक वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. यात वाघांसह रानगवा, अस्वल, सांबर, चितळ या प्राण्यांच्या समावेश आहे. या मार्गावर वन्यजीवांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. दक्षिणेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्य यांना जोडणाऱ्या व्याघ्रभ्रमण मार्गाला छेदून जातो. तर उत्तरेला ब्रह्मपुरी जोडणऱ्या भ्रमण मार्गाला छेदतो. त्यामुळे रेल्वेमार्गामुळेही वन्यजीव संकटात सापडलेले आहे.

Uttar Pradesh Crime: सामूहिक हत्याकांड! तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार जनाची कुऱ्हाडीने केली हत्या; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: चंद्रपूर जिल्ह्यात किती वाघ आहेत?

    Ans: सुमारे 300 वाघ असल्याचा अंदाज आहे.

  • Que: मानव-वन्यजीव संघर्ष का वाढतोय?

    Ans: वनक्षेत्र कमी पडणे, अतिक्रमण व मानवी हस्तक्षेप वाढणे ही प्रमुख कारणे आहेत.

  • Que: 2025 मध्ये किती नागरिकांचा बळी गेला?

    Ans: मानव-वन्यजीव संघर्षात 49 नागरिकांचा मृत्यू झाला.

Web Title: Chandrapur human wildlife conflict increasing in chandrapur 300 tigers and human lives in danger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Chandrapur
  • chandrapur news
  • tiger

संबंधित बातम्या

Chandrapur News: कर्जमाफीचा निर्णय कधी? चंद्रपूरमध्ये 3.5 लाख शेतकरी प्रतीक्षेत, सातबारा कोरा होणार का?
1

Chandrapur News: कर्जमाफीचा निर्णय कधी? चंद्रपूरमध्ये 3.5 लाख शेतकरी प्रतीक्षेत, सातबारा कोरा होणार का?

Chandrapur: चंद्रपूर-यवतमाळ सीमेवरील पैनगंगा नदीच्या घाटावर अद्याप पूल नाही; ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास
2

Chandrapur: चंद्रपूर-यवतमाळ सीमेवरील पैनगंगा नदीच्या घाटावर अद्याप पूल नाही; ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास

Maharashtra Politics: काँग्रेसला घरघर! ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; भाजपची ताकद वाढली
3

Maharashtra Politics: काँग्रेसला घरघर! ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; भाजपची ताकद वाढली

भुकेने व्याकुळ झाला, शरीराची झाली काठी… पटणा प्राणीसंग्रहातील पांढऱ्या वाघाचा Video Viral; अवस्था पाहून नेटकरी संतापले
4

भुकेने व्याकुळ झाला, शरीराची झाली काठी… पटणा प्राणीसंग्रहातील पांढऱ्या वाघाचा Video Viral; अवस्था पाहून नेटकरी संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.