Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरात वाघांची संख्या ३०० पार; वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असून आता त्यांच्या व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जंगलातील वाढत्या वाघांच्या वावरामुळे मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढत असून प्रभावी उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2026 | 02:50 PM
Chandrapur News: चंद्रपुरात वाघांची संख्या ३०० पार; वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

Chandrapur News: चंद्रपुरात वाघांची संख्या ३०० पार; वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूर जिल्ह्यात मागील १० वर्षांत वाघांची संख्या २५ वरून वाढून जवळपास ३०० पर्यंत पोहोचली आहे.
  • वाढत्या वाघसंख्येमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
  • वाघ संवर्धनासोबतच मनुष्यबळ, निधी आणि व्यवस्थापन व्यवस्था मजबूत करण्याची मागणी होत आहे.
चंद्रपूर: वाघांच्या अधिवासासाठी ओळखला जाणारा चंद्रपूर जिल्हा आता वाढत्या वाघसंख्येमुळे नव्या व्यवस्थापनाच्या आव्हानांना सामोरे जात आहे. मागील १० वर्षात जवळपास वाघांच्या संख्येत ६ पटीने वाढ झालेली आहे. जंगलातील वाघांची संख्या सातत्याने वाढत असताना, त्यांच्या अधिवासावर वाढता ताण, अन्नसाखळीवरील दबाव, जंगलालगतच्या गावांमध्ये वाढणारा वावर आणि मानव-वन्यजीव संघर्ष या समस्या अधिक गंभीर होत आहेत. त्यामुळे ‘वाघ वाढले, पण त्यांच्या व्यवस्थापनाचे काय?’ हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या अधिवासास प्रारंभ होत असताना २०१० च्या सुमारास जिल्ह्यात जवळपास २५ एवढी वाघांची संख्या होती. ती संख्या वाढून २०१५ मध्ये ५० च्या जवळपास पोहचली. आज जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या ही ३०० च्या जवळपास पोहचलेली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामांच्या बेटरमेंट चार्जेसमध्ये १००% सूट

त्यामुळे वाढत्या वाघांच्या संख्येबरोबर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, मूल, सावली आणि इतर वनपरिक्षेत्रांमध्ये वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक वाघांनी संरक्षित जंगलांच्या सीमाही ओलांडल्या असून ते शेती, गावांच्या परिसरात तसेच मानवी वस्तीजवळ वारंवार दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, गुराखी आणि जंगलावर अवलंबून असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

मागील ५ वर्षात वाघांच्या हल्ल्यात २२० नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक गंभीर जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. पाळीव जनावरांवर होणारे हल्लेही वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वनविभागाकडून नियमित गस्त, कॅमेरा ट्रॅपद्वारे निरीक्षण, जनजागृती, तातडीच्या बचाव पथकांची नियुक्ती आणि संघर्षग्रस्त भागांमध्ये विशेष उपाययोजना करण्यात येत असल्या तरी वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजनांची व्याप्ती आणखी वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. विशेषतः गावांमध्ये तत्काळ सूचना प्रणाली, प्रशिक्षित रेस्क्यू पथके, कॉरिडॉरचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्याची मागणी होत आहे.

चंद्रपूर व्याघ्र जिल्हा म्हणून ओळखले जातो. ताडोबा व्याघ्र प्रकल्प शिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण वनक्षेत्रात वाधाची संख्या अधिक आहे. आज जिल्ह्यातील वाघाची संख्या ३०० च्या घरात पोहचली आहे. मात्र व्यवस्थापन दर्जा मात्र ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत प्रादेशिक वनक्षेत्रात कमजोर आहे. सातत्याने मनुष्यबळ, संसाधने आणि निधीची पूर्तता केली जात नसल्याने व्याघ्र संवर्धन आणी वाघ-मानव संघर्ष हाताळणे कठीण होत आहे. कोर-बफर पेक्षा प्रादेशिक वनक्षेत्रात असलेल्या गावात वाघ मानव संघर्ष तीव्र असल्याने त्याच्या व्यवस्थापनात एकसूत्रता आणणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील संघर्ष निवारण्यासाठी शासनस्तरावर पावले उचलणे आणी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. – बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो संस्था, चंद्रपूर

 ‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार! काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

वाघांचा मृत्यूवर चिंतनाची गरज

वाघांच्या वाढत्या संख्येसोबतच मागील काही वर्षांमध्ये वाघांच्या मृत्यूची संख्याही झपाट्‌याने वाढत आहे. जिल्ह्यातील जंगलात, शेतशिवार परीसरात, रेल्वे ट्रॅकवर वाघांचे मृत्यू होत असल्याच्या घटना वाढल्यामुळे ही चिंतनाची बाब बनलेली आहे. सोबतच वाघांवर तात्पूरते उपचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरवरही क्षमतेपेक्षा तिनपट प्राण्यांवर उपचार होत असल्याची बाब समोर आल्यामुळे वाघांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur tiger population reaches 300 human wildlife conflict rises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Johnson Baby Powder: बेबी पावडरमुळे कॅन्सर? सर्व खटले निकाली काढण्यासाठी कंपनी देणार तब्बल इतके कोटी; घेतला मोठा निर्णय
1

Johnson Baby Powder: बेबी पावडरमुळे कॅन्सर? सर्व खटले निकाली काढण्यासाठी कंपनी देणार तब्बल इतके कोटी; घेतला मोठा निर्णय

Minimum Balance: संसदेत मोठा खुलासा! मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने बँकांनी वसूल केले हजारो कोटी; ‘या’ बँकांची सर्वाधिक कमाई
2

Minimum Balance: संसदेत मोठा खुलासा! मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने बँकांनी वसूल केले हजारो कोटी; ‘या’ बँकांची सर्वाधिक कमाई

पॅकेटवर साखरेचे प्रमाण छापणे बंधनकारक! संसदीय समितीची केंद्राला शिफारस
3

पॅकेटवर साखरेचे प्रमाण छापणे बंधनकारक! संसदीय समितीची केंद्राला शिफारस

Raigad News: कर्जतमध्ये टोरंट पॉवर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; जमिनी देण्यास नकार, ग्रामसभेत ठराव मंजूर
4

Raigad News: कर्जतमध्ये टोरंट पॉवर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; जमिनी देण्यास नकार, ग्रामसभेत ठराव मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.