चंद्रकांत खैरे - अंबादास दानवे यांच्यातील वाद पेटला (फोटो- सोशल मिडिया)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे आयोजन विधान परिषदेचे पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार चंद्रकांत खैरे ऊपस्थित राहिले नव्हते. चंद्रकांत खैरे उपस्थित न राहिल्याने दानवे व्खैरे यांच्यातील वैर पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा आहे. दरम्यान या मेळाव्यावरून खैरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
अंबादास दानवे यांच्या मेळाव्यावर बोलताना चंद्रकांत खैरे यांचा संतापाचा कडेलोट झाल्याचे पाहायला मिळाले. या मेळाव्याबाबत मला अंबादास दानवे यांनी काही सांगितले नाही. याबाबत मी उद्धव ठाकरेंशी बोलणार आहे. तक्रार करणार आहे. अंबादास दानवे मोठे झाल्यासाखे वागत आहे. शिवसेना मी वाढवली आहे. हे नंतर आले आणि काड्या करण्याचे काम करत आहेत, असे खैरे म्हणाले. ।
पक्षाचा कार्यक्रम होणार आहे याबाबत मला कोणी सांगितले नव्हते. मला कार्यकर्त्याशी चर्चा करायची होती. मात्र मी नसतानाच कार्यक्रम संपवून टाकला. मला निमंत्रण नव्हते. मला बोलवायला हवे होते. आज उद्धव ठाकरे अडचणीत आहेत. एकत्रित येऊन काम करावे लागेल. कुणी गटबाजी करत असेल तर मला ते मान्य नसेल. माझं काहीही झाले तरी मी पक्ष सोडणार नाही असे खैरे म्हणाले.
अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर टीका
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे नांदेड दौऱ्यावर होते. पक्षाची संघटनात्मक बांधणी व जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी अंबदास दानवे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. दानवे नांदेड, हिंगोली, परभणी व जालना या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. दरम्यान नांदेड दौऱ्यावर असताना दानवे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाकरेंवरील टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. गद्दार बाबुरावपेक्षा फुकटचा बाबुराव काय वाईट आहे, गद्दारी करण्यापेक्षा फुकट राहणं काय वाईट आहे, असे दानवे यांनी शिंदे यांना सडेतोड उत्तर दिले आहे. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “जय पद्धतीने नितेश राणे यांची वक्तव्ये राज्यभरातून येत आहे. त्यामुळे मला असं वाटतं एक दिवस नितेश राणेला सुद्धा असंच जाव लागणार आहे.
Ambadas Danve: “गद्दार बाबुरावपेक्षा फुकटचा…”; अंबादास दानवेंचे एकनाथ शिंदेंना सडेतोड प्रत्युत्तर
अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील यांची भेट
राज्याचे नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले असून संसदेमध्ये अद्याप अधिवेशन सुरु आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये अर्थात राज्यसभा आणि लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारित विधेयक पारित करण्यात आले आहे. यामध्ये ठाकरे गटाने विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केले आहे. मुस्लीम समाजाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून हे विधेयक आणले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची भेट घेतली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.