आषाढी वारीमुळे वाहतूकीमध्ये बदल
पिंपरी : पुण्यामध्ये लवकरच संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन होणार आहे. देहू व आळंदीमधून पालखीच्या प्रस्थानाची तयारी पूर्ण झाली असून पालखी सोहळ्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, आषाढी वारीमुळे लाखो वारकरी पिंपरी चिंचवडमधून पुणे शहरामध्ये येत असतात. यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालथीचे प्रस्थान 28 जून रोजी आळंदीमधून ज्ञानेश्वर महाहराजांची पालखी 29 जून रोजी प्रस्थान करणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतूकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
आळंदी परिसरातील बदल
वाहतुकीत करण्यात आलेले बदलमंगळवारी (ता. 25) दुपारी बारा ते रविवारी (ता.30) रात्री नऊ वाजेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत लागू राहणार आहे.