Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपची राज्यात मोठी ‘लाट’! ९०० हून अधिक जागांवर सर्वात मोठ्या पक्षाची झेप; ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळला

आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, भारतीय जनता पक्षाने (BJP) राज्यात ऐतिहासिक मुसंडी मारली असून ९०५ जागांवर आघाडी घेत आपला क्रमांक एकचा दर्जा राखला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 16, 2026 | 03:06 PM
भाजपची राज्यात मोठी ‘लाट’! ९०० हून अधिक जागांवर सर्वात मोठ्या पक्षाची झेप (Photo Credit- X)

भाजपची राज्यात मोठी ‘लाट’! ९०० हून अधिक जागांवर सर्वात मोठ्या पक्षाची झेप (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • भाजपची राज्यात मोठी ‘लाट’!
  • ९०० हून अधिक जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष
  • ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळला
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election 2026: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल जाहीर होत असून, संपूर्ण महाराष्ट्रात ‘कमळ’ जोमाने फुलल्याचे चित्र दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, भारतीय जनता पक्षाने (BJP) राज्यात ऐतिहासिक मुसंडी मारली असून ९०५ जागांवर आघाडी घेत आपला क्रमांक एकचा दर्जा राखला आहे. दुसरीकडे, शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने शिवसेनेच्या दोन्ही गटांना धूळ चारत भगव्या गडावर ‘निळा’ आणि ‘केसरी’ झेंडा फडकवला आहे.

भाजपची मोठी झेप

राज्यातील २९ महापालिकांच्या मतमोजणीत भाजपने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने भाजपने अनेक शहरांत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा ‘बाण’ अडकला!

सर्वात मोठा उलटफेर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत पाहायला मिळत आहे. दशकानुदशके शिवसेनेचा गड राहिलेल्या या शहरात यावेळी भाजपने सुरुंग लावला आहे. भाजपचे उमेदवार सध्या २३ जागांवर आघाडीवर असून त्यांनी महापौरपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

संभाजीनगरमधील धक्कादायक आकडेवारी:

भाजप: ३५ जागा (आघाडी)

MIM: १६ जागा (आघाडी)

शिवसेना (शिंदे गट): १५ जागा (आघाडी)

शिवसेना (ठाकरे गट): ०८ जागा (आघाडी)

वंचित बहुजन आघाडी: ०४ जागा (आघाडी)

काँग्रेस: ०३ जागा (आघाडी)

कोल्हापुरात 81 पैकी 28 जागांचे निकाल जाहीर; काँग्रेसची आघाडी तर भाजप…

दिग्गजांना धक्का; एमआयएमची जोरदार मुसंडी

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे ताकदवान नेते आणि मंत्री संजय शिरसाट तसेच खासदार संदीपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, मतदारांनी दिलेला कौल पाहता या नेत्यांना मोठा झटका बसला आहे. दुसरीकडे, असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने (MIM) १५ जागांवर आघाडी घेत मोठी मुसंडी मारली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा निकाल अत्यंत क्लेशदायक ठरला असून, त्यांनी आपला हा महत्त्वाचा बालेकिल्ला गमावला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने ४ जागा मिळवत किंगमेकरच्या भूमिकेत येण्याचे संकेत दिले आहेत.

पुणे, मुंबई आणि नाशिकमध्येही ‘कमळ’ जोरात

केवळ संभाजीनगरच नव्हे, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने आपली सत्ता कायम राखल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेतही (BMC) भाजप आणि ठाकरे गटात अटीतटीची लढत सुरू असून, तिथेही भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील या निकालांनी आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी दिली असून, विरोधकांसाठी हा निकाल आत्मचिंतन करायला लावणारा ठरला आहे.

Nagpur Election Results 2026: मुख्यमंत्र्यांनी गड राखला! नागपुरात भाजपला बहुमत; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगर हर्षदा शिरसाट प्रभाग क्रमांक १८ मधून मोठ्या मताधिक्याने विजय

पालकमंत्र्याची मुलं असल्यामुळे आमच्या विरोधात नाही ते आरोप करण्यात आले. आमच्यावरती आरोप केले मात्र आमच्या सोबत शिवसैनिक आहेत. शिवसैनिकांनी मनाने काम केलं आणि हा विजय त्यांचा विजय आहे. महानगरपालिकेत गेल्यानंतर असं काम करायचं की पुढच्या पाच वर्षानंतर आम्हाला लोकांकडे जायची गरज पडली नाही पाहिजे. महापौर पदाचा आणखीन आरक्षण निघालेलं नाहीये त्यावर मी भाष्य करू शकत नाही. जी काही घडामोड होईल ती पुढे होईल जेव्हा महापौर पदाचे आरक्षण निघेल.

Web Title: Bjp wave in maharashtra municipal election results 2026 leading in 900 plus seats thackeray loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

Jalgaon Election 2026 : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने जेलमधून दाखवली ताकद; कारागृहातून ललित कोल्हे विजयी
1

Jalgaon Election 2026 : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने जेलमधून दाखवली ताकद; कारागृहातून ललित कोल्हे विजयी

PCMC Election Result 2026: लांडगेंना ‘नासका आंबा’ म्हणणे महागात; ‘दादां’चा झाला सुपडासाफ
2

PCMC Election Result 2026: लांडगेंना ‘नासका आंबा’ म्हणणे महागात; ‘दादां’चा झाला सुपडासाफ

राज्यात ‘फॅमिली युनिटी’ फेल! शरद-अजित पवारांना बालेकिल्ल्यातच मात; मुंबईत ठाकरे बंधूंचा ‘मराठी बाणा’ फेल
3

राज्यात ‘फॅमिली युनिटी’ फेल! शरद-अजित पवारांना बालेकिल्ल्यातच मात; मुंबईत ठाकरे बंधूंचा ‘मराठी बाणा’ फेल

Nitesh Rane : नितेश राणे भाजपच्या विजयाने हरखला! हसूच थांबेना, आदित्य ठाकरेला डिवचले, ‘जय श्रीराम’ म्हणत शेअर केला व्हिडिओ
4

Nitesh Rane : नितेश राणे भाजपच्या विजयाने हरखला! हसूच थांबेना, आदित्य ठाकरेला डिवचले, ‘जय श्रीराम’ म्हणत शेअर केला व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.