कोल्हापुरात 81 पैकी 28 जागांचे निकाल जाहीर; काँग्रेसची आघाडी तर भाजप... (संग्रहित फोटोे)
कोल्हापूर : मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूरसह इतर 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. राज्यातील अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. राज्यात सरासरी 60 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येत आहे. सध्या मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरु आहे. कोल्हापुरात 81 पैकी 28 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत 81 पैकी 28 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली असून, 11 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप 10, एकनाथ शिदेंच्या शिवसेना 5 जागांवर विजयी झाली आहे. जनसुराज्य पक्ष 1 तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहिला मिळत आहे. दोन्ही पक्षामध्ये एका जागेचा फरक आहे. सध्या या ठिकाणी मतमोजणी सुरु असून, आता लवकरच उर्वरित जागांचे निकाल समोर येणार आहेत.
हेदेखील वाचा : Nagpur Election Results 2026: मुख्यमंत्र्यांनी गड राखला! नागपुरात भाजपला बहुमत; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेतील निकालानुसार महायुतीने २५ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी २१ जागांवर आघाडीवर आहे. जनसुराज्यला १ जागा मिळाली आहे. या निकालानुसार महापालिकेत महायुतीचा दबदबा स्पष्ट दिसत आहे.
पुण्यात भाजप आघाडीवर
पुण्यात भाजप आघाडीवर आहे. पुण्यात मतमोजणी दरम्यान केंद्रावर मोठा तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रूपाली ठोंबरे यांनी ईव्हीएम मशीन संबंधित काही गंभीर आरोप केले असून, त्यांच्या या आरोपांमुळे आता मतमोजणी केंद्रावर मोठा तणाव निर्माण झाला आहे. पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळीच सुरुवात झाली आहे. मतमोजणी सुरु असतानाच प्रभाग क्रमांक 25 च्या मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
हेदेखील वाचा : BMC-Maharashtra Municipal Election Result 2026 Live: मुंबईत वार फिरलं! ठाकरे बंधुना झटका; भाजप महायुतीची मुसंडी






