औरंगाबाद महानगरपालिकेत आतापर्यंत ११५ वॉर्ड होते. आता ४२ प्रभाग आणि १२६ सदस्य अशी रचना होणार आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक २९ नगरसेवक निवडून आले होते. २४ नगरसेवकांसह तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपासोबत शिवसेनेनं सत्ता स्थापन केली होती. महापौरपद अडीज वर्ष शिवसेनेने आणि उरलेले अडीज वर्ष भाजपने भूषवले. तर २६ सदस्यांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमआयएमचा विरोधी पक्ष नेता होता. कॉंग्रेस १०, राष्ट्रवादी ३ आणि २३ सदस्य अपक्ष आणि छोट्या पक्षांचे होते.






