Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नो-नेटवर्क भागातील नागरिकांना दिलासा! ‘या’ तारखेपासून थेट घरात येणार नळ; महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर शहरातील 'नो-नेटवर्क' भागांना प्राधान्याने नळजोडण्या दिल्या जाणार आहेत. १२ जूनपासून १५०० मिमीची मुख्य जलवाहिनी सुरू होणार असून हर्सूल-जटवाडा भागात २० MLD वाढीव पाणी मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 07, 2026 | 04:23 PM
नो-नेटवर्क भागातील नागरिकांना दिलासा! 'या' तारखेपासून थेट घरात येणार नळ

नो-नेटवर्क भागातील नागरिकांना दिलासा! 'या' तारखेपासून थेट घरात येणार नळ

Follow Us
Follow Us:

 

  • नो-नेटवर्क भागातील नागरिकांना दिलासा!
  • ‘या’ तारखेपासून थेट घरात येणार नळ
  • महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची मोठी घोषणा
छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेपासून वंचित राहिलेल्या नो-नेटवर्क भागांना आता प्राधान्याने नळजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या भागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी जलवाहिन्या टाकून नागरिकांच्या मालमत्तांना नळकनेक्शन उपलब्ध करून देण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

वाढीव पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नव्या योजनेचा लाभ सर्वप्रथम नो-नेटवर्क भागांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहरासाठी अतिरिक्त पाणी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गेल्या तीन ते चार दिवसांत सुमारे २० एमएलडी वाढीव पाणी शहराला मिळाले आहे. सध्या हे पाणी महापालिकेच्या विद्यमान वितरण यंत्रणेद्वारे विविध भागांत पोहोचविले जात आहे.

महापालिकेच्या नियोजनानुसार १२ जूनपासून नवीन योजनेतील १५०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार असून हसूल जटवाडा परिसरापर्यंत नव्या योजनेचे पाणी पोहोचविण्याची तयारी सुरू आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले की, नवीन योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या १९ जलकुंभांचे काम पूर्ण झाले असून त्यापैकी १० जलकुंभ नो-नेटवर्क भागात आहेत. त्यामुळे या भागांमध्ये पाणीवितरणाची अंमलबजावणी प्रथम करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक जलवाहिन्या टाकण्याचे काम पुढील काही दिवसांत सुरू होईल. नळजोडण्या देण्याबाबत महापालिकेकडून स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहेत. संबंधित यंत्रणांना या सूचनांनुसारच काम करणे बंधनकारक राहणार आहे.

१२ जूनपासून नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील १५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी १२ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून हर्सल जटवाडा भागापर्यंत नवीन योजनेचे पाणी पोहोचविले जाणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मिळालेल्या २० एमएलडी वाढीव पाण्याचा पुरवठा सध्या जुन्या वितरण यंत्रणेतून केला जात असून, नवीन व्यवस्था सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठ्याची क्षमता आणखी वाढणार आहे.

नो-नेटवर्क भागांसाठी स्वतंत्र नियोजन

नवीन योजनेतील १९ पैकी १० जलकुंभ नो-नेटवर्क भागात उभारण्यात आले आहेत. त्यामुळे या भागांतील नागरिकांना प्राधान्याने नळजोडण्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलवाहिन्या टाकणे, नळकनेक्शन देणे आणि पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित करणे या सर्व कामांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्वे तयार केली जाणार असून त्यानुसारच अंमलबजावणी होणार आहे.

Farmer Protest: सरकारची कर्जमाफी म्हणजे डोळ्यात धूळफेक… शेतकरी संघटना आक्रमक, शासन निर्णयाची केली होळी

Web Title: Chhatrapati sambhajinagar water supply no network areas to get new connections from june 12

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis
  • Water supply

संबंधित बातम्या

ऐतिहासिक पैठण नगरीत कचऱ्याचे साम्राज्य! ७० हजार लोकसंख्येसाठी अवघ्या २ घंटागाड्या; पावसाळ्यापूर्वी रोगराईची भीती
1

ऐतिहासिक पैठण नगरीत कचऱ्याचे साम्राज्य! ७० हजार लोकसंख्येसाठी अवघ्या २ घंटागाड्या; पावसाळ्यापूर्वी रोगराईची भीती

Chhatrapati Sambhajinagar: नोकरीच्या आमिषातून ‘लव्ह ट्रॅप’चा सापळा? YouTube वर लग्न अन् लैंगिक छळ, विवाहित शिक्षिकेची भयावह कहाणी
2

Chhatrapati Sambhajinagar: नोकरीच्या आमिषातून ‘लव्ह ट्रॅप’चा सापळा? YouTube वर लग्न अन् लैंगिक छळ, विवाहित शिक्षिकेची भयावह कहाणी

Water Crisis : पाणीटंचाईने नागरिक हैराण; मिरा-भाईंदरमध्ये पाणीप्रश्नी शिवसेनेचा इशारा, ९ जूनला महिलांचा ‘टमरेल मोर्चा’
3

Water Crisis : पाणीटंचाईने नागरिक हैराण; मिरा-भाईंदरमध्ये पाणीप्रश्नी शिवसेनेचा इशारा, ९ जूनला महिलांचा ‘टमरेल मोर्चा’

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी
4

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.