Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; केंद्रीय पथकाच्या दौऱ्याचा निष्कर्ष काय? एक महिना उलटूनही अहवाल नाही!

अतिवृष्टीने बाधित मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर नाही. केंद्रीय पाहणी पथक येऊन एक महिना झाला तरी केंद्राकडे अहवाल सादर झाला नाही. मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षेत."

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 07, 2025 | 02:59 PM
अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत (Photo Credit - X)

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

  • फक्त शांत करण्यासाठी दौरा?
  • मराठवाड्यातील शेतकरी मदतीविना मेटाकुटीला
  • मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षेत
छत्रपती संभाजीनगर: यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झालेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात येऊन गेले. या पथकाला येऊन एक महिना उलटला तरी केंद्राला काय अहवाल दिला आणि त्या दौऱ्याचे फलित काय, हा विषय अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आलेला दौरा हा केवळ त्यांना शांत करण्यासाठी होता काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मराठवाड्यावर पावसाचा मोठा कहर

यंदा पावसाने राज्याच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये अधिक कहर माजवला. शेतांना तळ्याचे स्वरूप आले, शेतीपिके पाण्याखाली गेली आणि जमीन खरडून निघाली. हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतला. संभाजीनगरमधील पैठण, धाराशिव (उस्मानाबाद) आणि लातूर सारख्या भागांत केंद्रीय पथकाने बांधावर जात पाहणी केली होती. शेतकऱ्यांनी आपली झालेली दयनीय अवस्था पथकातील अधिकाऱ्यांना दाखवली होती.

हे देखील वाचा: CM Devendra Fadnavis: फडणवीस सरकारची ऐतिहासिक कामगिरी, एका महिन्यात ४५,९११ सौर पंप लावून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद

केंद्रीय पथकात कोण होते?

सदरील पथकाचे नेतृत्व केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडेय यांनी केले होते. अतिवृष्टीग्रस्तांना एनडीआरएफच्या (NDRF) निकषानुसार मदत दिली जाते. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर केंद्र सरकार मदतीची ही रक्कम राज्य सरकारला देईल.

अहवालाची प्रतीक्षा

जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे करून अहवाल राज्य सरकारला सादर केला. राज्य सरकारनेही सर्व निकष बाजूला ठेवत मदत जाहीर केली. त्यानंतर केंद्राने मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी हे पथक पाठवले.

  • पथकातील सदस्यांनी भेटी दिल्यावर लवकरच अहवाल सादर करणार असल्याचे सांगत काढता पाय घेतला.
  • हा दौरा केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी होता, असा आरोप विरोधकांकडून केला जात होता.
  • दरम्यान, राज्यात सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात झाले असल्याने, केंद्रीय पाहणी पथकाचा अहवाल केंद्राकडे सादर झाला की नाही, याबद्दल एक महिना उलटूनही स्पष्टता नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar: ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातून ५ महत्त्वाच्या रस्त्यांचा विकास; १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Web Title: Heavy rain affected farmers await help what is the conclusion of the central teams visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Central Governement
  • farmer
  • Heavy Rain
  • Marathwada

संबंधित बातम्या

Indigo flight crisis: विमान तिकिटे महाग झाल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय; कमाल भाडे मर्यादा निश्चित, जाणून घ्या नवीन दरांची यादी
1

Indigo flight crisis: विमान तिकिटे महाग झाल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय; कमाल भाडे मर्यादा निश्चित, जाणून घ्या नवीन दरांची यादी

Ayushman Bharat Yojana: आजारी पडला तर घर विकावे लागणार नाही..; आयुष्मान भारत योजना कशी मिळवायची? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर
2

Ayushman Bharat Yojana: आजारी पडला तर घर विकावे लागणार नाही..; आयुष्मान भारत योजना कशी मिळवायची? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

Sanchar Saathi: मोठी बातमी! ‘संचार साथी’ प्री-इंस्टॉल करण्याचा निर्णय मागे! सरकारने स्मार्टफोन कंपन्यांना दिलेले निर्देश रद्द
3

Sanchar Saathi: मोठी बातमी! ‘संचार साथी’ प्री-इंस्टॉल करण्याचा निर्णय मागे! सरकारने स्मार्टफोन कंपन्यांना दिलेले निर्देश रद्द

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सरकारचा DA मूळ वेतनात विलीनीकरणाला स्पष्ट नकार
4

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सरकारचा DA मूळ वेतनात विलीनीकरणाला स्पष्ट नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.