औरंगाबाद : दोन दुचाकीमध्ये धडक होऊन अपघात झाल्याने दोन तरूणांना प्राण गमवावे लागले आहे. पैठण तालुक्यातील पैठण- पाचोड मार्गावर हा अपघात झाला. यातील एक तरुण आपल्या पत्नीला बारावीच्या परीक्षेसाठी निघाला होता तर दुसरा नातेवाईकांच्या घरी कुंकवाच्या कार्यक्रमावरून गावी परतत होता. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. नितीन साबळे आणि गणेश शेळके अशी मृतांची नावे आहेत.
पैठण- पाचोड रस्त्यावर झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. गोन्ही गाड्या भरधाव वेगात असल्यामुळे एकमेकांवर आदळताच गाडीवरील नितीन साबळे हे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतात सुमारे अडीचशे ते तीनशे फूट लांब जाऊन पडले. तर अपघातातील दुसरे जखमी खूप वेगाने जाऊन झाडावर लकटले. तर आणखी एक जण जागीच मृत्यूमुखी पडले.
[read_also content=”https://www.navarashtra.com/world/ukraines-secret-plan-against-russia-249518.html पुतीन यांच्या सैन्याला जिवंतर गाडू, युक्रेनचा दावा ! युक्रेनचा सिक्रेट प्लॅन ज्यामुळे रशिया कधीच…”]
अपघातात नितीन साबळे हे पत्नीला बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सोडून निघाले होते. यांचा मृत्यू झाला. गणेश शेळके हे कुतुबखेडा येथे नातेवाईकाचा कुंकवाचा कार्यक्रम आटोपून बुलेटवर गावी परतत होते. हेदेखील अपघातात मृत्यूमुखी पडले. तर, अपघातातील जखमीचे नाव कळू शकले नाही.