Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर तिहेरी ताण! बाष्पीभवनामुळे दररोज कोट्यवधी लिटर पाणी हवेत; मराठवाड्यावर पाणीसंकटाचे सावट

Jayakwadi Dam News: जायकवाडी धरणात बाष्पीभवनामुळे दररोज १.९०२ दलघमी पाणी कमी होत आहे. वाढती मागणी आणि उष्णतेमुळे धरणावर तिहेरी ताण निर्माण झाला असून मराठवाड्यासमोर पाणीसंकट उभे राहिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 01, 2026 | 03:11 PM
जायकवाडी धरणावर तिहेरी ताण! बाष्पीभवनामुळे दररोज कोट्यवधी लिटर पाणी हवेत

जायकवाडी धरणावर तिहेरी ताण! बाष्पीभवनामुळे दररोज कोट्यवधी लिटर पाणी हवेत

Follow Us
Follow Us:

 

  • जायकवाडी धरणावर तिहेरी ताण!
  • बाष्पीभवनामुळे दररोज कोट्यवधी लिटर पाणी हवेत
  • मराठवाड्यावर पाणीसंकटाचे सावट
पैठण (वा) : मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या नाथसागर अर्थात जायकवाडी धरण्याच्या पाणीसाठ्यावर उन्हाच्या तीव्रतेचा मोठा परिणाम (Jayakwadi Dam Water Leve) होत असून, दररोज कोट्यवधी लिटर पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. वाढते तापमान, वाढती मागणी आणि सततचा पाण्याचा विसर्ग यामुळे धरणावर तिहेरी ताण निर्माण झाला आहे. गुरुवार (दि. ३०) रोजी धरणातील एकूण पाणीसाठा १७७७.३७७ दलघमी नोंदवण्यात आला असून, त्यापैकी जिवंत साठा १०३९.२७१ दलघमी अर्थात ४७.८७ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी उपयुक्त साठा ८७५.३५० दलघमी (४०.३२%) इतका होता.

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी उभारण्यात आलेली समांतर जलवाहिनी योजना कार्यान्वित झाल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच डिएमआयसी अंतर्गत शेंद्रा औद्योगिक क्षेत्रासाठी सुरू असलेला पाणीउपसा ही अतिरिक्त गरज निर्माण करत आहे. औद्योगिक विस्तार आणि शहरीकरणाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, धरणातील उपलब्ध साठ्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. एप्रिलपासूनच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, मे महिन्यात ते ४३ ते ४५ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असून, साठ्यातील घट अधिक तीव्र होण्याचा धोका आहे.

नाथसागर धरणावर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अवलंब आहे. तसेच लाखो हेक्टर शेती विशेषतः कापूस, ऊस आणि भाजीपाला ही कालव्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे साठ्यातील घट ही केवळ आकडेवारीपुरती मर्यादित न राहता, ती थेट जनजीवन आणि अर्थकारणावर परिणाम करणारी ठरत आहे.

जायकवाडीचे नियोजन की पैशांचा ‘उद्योग’? ७५० कोटींच्या नव्या टेंडरमुळे चर्चांना उधाण; तज्ज्ञांकडून पाणी नियोजनावर प्रश्नचिन्ह

उजव्या, डाव्या कालव्यातून होतोय पाण्याचा विसर्ग

सध्या शेतीसाठी उजव्या कालव्यातून १५०० क्युसेक (३.६६९९ दलघमी) आणि डाव्या कालव्यातून २२०० क्युसेक (५.३८२५ दलघमी) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची पाणीपातळी १५१०.९२ फूट (४६०.५२८ मीटर) इतकी नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे, दररोज सुमारे १.९०२ दलघमी पाणी केवळ बाष्पीभवनामुळे कमी होत असून, हे प्रमाण कोट्यवधी लिटरमध्ये असल्याने धरणाच्या साठ्यावर मोठा परिणाम होत आहे.

तिहेरी ताणामुळे परिस्थिती गंभीर

समांतर जलवाहिनी, औद्योगिक पाणीउपसा आणि शेतीसाठी सुरू असलेला विसर्ग या तिन्ही घटकांमुळे धरणावर तिहेरी ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, वापरावर नियंत्रण आणि दीर्घकालीन जलव्यवस्थापनाची अंमलबजावणी ही काळाची गरज बनली आहे. एकंदरीत, दररोज कोट्यवधी लिटर पाणी बाष्पीभवनामुळे हवेत जात असताना वाढती मागणी ही परिस्थिती अधिकच गंभीर करत असून, नाथसागर धरणाची धोक्याची घंटा आता स्पष्टपणे वाजू लागली आहे. आगामी उन्हाळा मराठवाड्यासाठी कठीण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उरमोडी धरणाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ नाव! राज्य शासनाचा निर्णय

Web Title: Jayakwadi dam water level depletion evaporation marathwada crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Jayakwadi Dam
  • Marathwada
  • Water Crisis

संबंधित बातम्या

हायड्रोलिक चाचणीवरून पेटला नवा वाद, मनपा आयुक्त येडगे चाचणीच्या बाजूने; महापौरांनी गरजेवरच उपस्थित केले प्रश्न
1

हायड्रोलिक चाचणीवरून पेटला नवा वाद, मनपा आयुक्त येडगे चाचणीच्या बाजूने; महापौरांनी गरजेवरच उपस्थित केले प्रश्न

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘तुमच्यासमोरच हात पकडतो, काय कराल?’ पतीसमोरच महिलेचा विनयभंग; विरोध करताच मायलेकांकडून हल्ला
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘तुमच्यासमोरच हात पकडतो, काय कराल?’ पतीसमोरच महिलेचा विनयभंग; विरोध करताच मायलेकांकडून हल्ला

पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये…; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
3

पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये…; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार

Chhatrapati Sambhajinagar Accident: पिकअप-दुचाकीचा भीषण अपघात!  एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
4

Chhatrapati Sambhajinagar Accident: पिकअप-दुचाकीचा भीषण अपघात! एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.