Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Protest: सरकारची कर्जमाफी म्हणजे डोळ्यात धूळफेक… शेतकरी संघटना आक्रमक, शासन निर्णयाची केली होळी

पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या कर्जमाफी जीआरची होळी करण्यात आली. जाचक अटी रद्द करून सरसकट सातबारा कोरा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 05, 2026 | 02:27 PM
सरकारची कर्जमाफी म्हणजे डोळ्यात धूळफेक...

सरकारची कर्जमाफी म्हणजे डोळ्यात धूळफेक...

Follow Us
Follow Us:

 

  • सरकारची कर्जमाफी म्हणजे डोळ्यात धूळफेक…
  • शेतकरी संघटना आक्रमक
  • शासन निर्णयाची केली होळी
पैठण, (वा.): राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ शब्दांचा खेळ असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बसस्टॉप चौकात गुरुवार (दि. ४ जून) रोजी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जी.आर.) होळी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

शासनाने मोठ्या गाजावाजात कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात काढण्यात आलेल्या शासन निर्णयातील जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी, अल्पभूधारक तसेच कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सरसकट कर्जमाफी न देता तांत्रिक त्रुटी आणि कठोर निकष लावल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडणार आहे, असे माऊली मुळे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हा जी.आर. म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असून त्याच्या निषेधार्थ आम्ही आज होळी केली आहे.

मोसंबीला ‘मिठाईचा दर्जा’ द्या! दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी; मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

जी. आर. ची होळी केल्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना जुनी कर्जे थकीत असल्यामुळे अनेक बँका नवीन पीक कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यातच अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकटे आणि पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

या आंदोलनात छावा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, जिल्हाप्रमुख साईनाथ कर्डीले, प्रदेश सल्लागार किशोर सदावर्ते, मराठवाडा चेंबर्सचे संचालक ज्ञानेश्वर उगले, मराठा सेवक पवन शिसोदे, मराठा सेवा संघाचे सुभाष नवथर, सचिव शिवाजी साबळे, विशाल काळे, रामेश्वर बाबणे, विठ्ठल दोरखे, कृष्णा काळे, ज्ञानेश्वर बर्ड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

… तर बँकांसमोर ठिय्या आंदोलन

शेतकऱ्यांनी शासनाकडे कर्जमाफीतील सर्व जाचक अटी तात्काळ रद्द करण्याची, सरसकट सातबारा कोरा करणारी कर्जमाफी लागू करण्याची तसेच आगामी खरीप हंगामासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शासनाने अटी शिथिल करून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी केली नाही, तर बँकांसमोर आणि शासकीय कार्यालयांवर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांचे काम वेगात, विखे पाटलांचे कौतुक; पण मनोज जरांगे यांनी व्यक्त केली ‘ही’ मोठी शंका

Web Title: Swabhimani shetkari sanghatana protest in paithan burns government loan waiver gr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • farmer
  • Farmer Protest
  • Paithan

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
1

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

Delhi News: दिल्लीत आंदोलनांचा तणाव वाढला! विद्यार्थ्यांनंतर आता हजारो शेतकरी राजधानीच्या दिशेने
2

Delhi News: दिल्लीत आंदोलनांचा तणाव वाढला! विद्यार्थ्यांनंतर आता हजारो शेतकरी राजधानीच्या दिशेने

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम
3

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला
4

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.