काय घडलं नेमकं?
पुण्यातील ज्या 7 रेस्टॉरंट्सवर एफडीएने धाडी टाकल्या, तिथे अन्न सुरक्षा कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. तपासणी दरम्यान हॉटेलच्या स्वयंपाकघरात कमालीची अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारत प्रशासनाने त्यांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.
प्रसिद्ध ‘मथुरा प्युअर व्हेज’वर मोठी कारवाई
पुण्यातील प्रसिद्ध ‘मथुरा प्युअर व्हेज’वर झालेली कारवाई सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. एफडीएच्या पथकाने या हॉटेलमधील अन्नपदार्थांचे नमुने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेत. हा चाचणी अहवाल जोपर्यंत अधिकृतपणे येत नाही, तोपर्यंत हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
हॉटेल चालकांचे धाबे दणाणले
राज्यात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कोणत्याही हॉटेलची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आगामी काळातही पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही तपासणी मोहीम अशीच तीव्रतेने सुरू राहणार असल्याने हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.
Navi Mumbai: खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू
Ans: FDAने प्रसिद्ध 'मथुरा प्युअर व्हेज' हॉटेल चाचणी अहवाल येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आणि सात रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित केले.
Ans: तपासणीत अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न, मुदतबाह्य अन्नसाठा आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले.
Ans: नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी राज्यभर हॉटेल्स व रेस्टॉरंट्सची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.






