Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: तुळजापूरची ज्योत घेऊन परतताना काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

नवरात्रोत्सवाच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. तुळजापूरहून आई तुळजाभवानीची ज्योत घेऊन गावाकडे परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 11, 2026 | 09:55 AM
Accident News: तुळजापूरची ज्योत घेऊन परतताना काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Accident News: तुळजापूरची ज्योत घेऊन परतताना काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला कंटेनरची धडक
  • भीषण अपघातात तिघांचा मृत्यू; एक तरुण गंभीर जखमी
  • कंटेनरचालक वाहनासह फरार; करमाड पोलिसांत गुन्हा दाखल
 

छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या तोंडावरच मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तुळजापूर येथून आई तुळजाभवानीची ज्योत घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे खुलताबाद तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

तुळजापूरहून ज्योत घेऊन निघाले होते तरुण

खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव आणि जाफ्राबादवाडी येथील काही तरुण आई तुळजाभवानीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला गेले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ज्योत घेत गावाकडे परतीचा प्रवास सुरू केला. काही तरुण ज्योत घेऊन धावत होते, तर ज्योतीसाठी तेलाचा पुरवठा करणारे दोघे जण दुचाकीवरून (एमएच २० सीएस ००७४) त्यांच्यासोबत जात होते.

हेही वाचा: फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

कंटेनरने दुचाकीला ५ किलोमीटर फरफटत नेले

दरम्यान, पिंपळगाव पांढरी परिसरात मागून आलेल्या भरधाव अज्ञात कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कंटेनरने दुचाकीला तब्बल पाच किलोमीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत नेले. या दुर्घटनेत जाफ्राबादवाडी येथील रहिवासी अक्षय राजपूत याचा जागीच मृत्यू झाला. अक्षय हा काटशेरी फाटा येथे गॅरेज चालवत होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोळेगाव येथील अमोल औटे आणि गोरख म्हस्कर यांचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शुभम आधाने हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कंटेनरचालक वाहनासह फरार

अपघातानंतर कंटेनरचालकाने घटनास्थळावर न थांबता वाहनासह पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी तरुणाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार कंटेनरचालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या पवित्र काळात देवीची ज्योत घेऊन परतणाऱ्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Tuljapur jyot returning youths accident three killed container chhatrapati sambhajinagar sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • Accident
  • Accident Death
  • Bike Accident
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • maharashtra crime cases

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक
1

Chhatrapati Sambhajinagar: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक

लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप
2

लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : शेतीत २ लाखांचा खर्च, हातात फक्त ५ हजार! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे सरसकट मदतीची मागणी
3

Chhatrapati Sambhajinagar : शेतीत २ लाखांचा खर्च, हातात फक्त ५ हजार! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे सरसकट मदतीची मागणी

Fatal Roller Coaster Accident: थरारक राईड ठरली जीवघेणी! अमेरिकेतील थीम पार्कमध्ये Roller Coasterवरून पडून एकाचा मृत्यू
4

Fatal Roller Coaster Accident: थरारक राईड ठरली जीवघेणी! अमेरिकेतील थीम पार्कमध्ये Roller Coasterवरून पडून एकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.