Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात १५ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच शेतकऱ्यांनो, खरिप पेरणीची घाई करू नका

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ जूनपर्यंत मुख्य मान्सून येण्याची शक्यता कमी असून केवळ वादळी पाऊस पडेल. बियाणे वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 08, 2026 | 02:47 PM
Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात १५ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच शेतकऱ्यांनो, खरिप पेरणीची घाई करू नका
Follow Us
Follow Us:
  • मराठवाड्यात १५ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच शेतकऱ्यांनो
  • खरिप पेरणीची घाई करू नका
  • पावसाळ्यात दक्षता घ्या
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): मान्सूनच्या वाटचालीचा परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही दिसून येत आहे. रविवारी दिवसभर अधिकांश ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी जाणवली. शहरवासीयांना आता पावसाची आतुरतेने प्रतीक्षा आहे. मात्र मान्सूनचा वेग आणि पुढील अंदाजित वाटचाल पाहता १५ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत महाराष्ट्रातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. संभाजीनगर शहर व जिल्ह्यात दोन ते तीन वेळा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता.

पावसाळ्यात दक्षता घ्या

दरम्यान, कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे कि, आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. तसेच नागरीकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Farmer Protest: सरकारची कर्जमाफी म्हणजे डोळ्यात धूळफेक… शेतकरी संघटना आक्रमक, शासन निर्णयाची केली होळी

Web Title: Weather forecast monsoon delayed till 15 june agriculture department advisory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • farmer
  • Weather

संबंधित बातम्या

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
1

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी
2

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी

शेतजमिनीचा वाद विकोपाला, पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला; समुद्रपूर तालुक्यातील घटनेनं खळबळ
3

शेतजमिनीचा वाद विकोपाला, पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला; समुद्रपूर तालुक्यातील घटनेनं खळबळ

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
4

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.